‘या’ गोष्टीसाठी सर्व राज्य सरकारांनी आणि पक्षांनी एकत्र यावं, असं म्हणत आहेत अरविंद केजरीवाल

राजकीय हेतू बाजूला ठेवून एकत्र येण्याचं आवाहन केजरीवालांनी केलंय.

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय. प्रदूषण रोखण्यासाठी सर्व राज्य सरकारं तसंत सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन एकत्र येण्याचं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. सर्व सरकारं आणि पक्ष जर एकत्र आले, तर अवघ्या चार वर्षातच आपण प्रदूषणासारखा गंभीर प्रश्न सहजपणे सोडवू शकतो, असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलाय. मात्र त्यासाठी प्रत्येक पक्षाने आपले राजकीय हेतू हे दूर ठेवून एकत्र आलं पाहिजे, असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.

दिल्लीत प्रदूषणाचा प्रश्न सातत्यानं भेडसावतो आहे. तो नियंत्रित करण्यासाठी दिल्ली सरकारनं ऑड-इव्हन तसंच सिग्नलवर गाडी बंद करण्यासारख्या अनेक योजना राबवल्या आहेत. फक्त दिल्लीतच नव्हे तर इतरही राज्यात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. वेळीच जर योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर प्रदूषणामुळे अनेक भयंकर परिणामांना तोंड द्यावं लागू शकतं, अशी भीती तज्ज्ञांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केजरीवालांनी केलंय.

जर सर्व पक्ष एकत्र आले, तर प्रदूषणाविरोधातली लढाई फक्त चार वर्षात जिंकता येईल, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. मात्र त्यासाठी राजकीय हेतू दूर ठेवावे लागतील. त्यामुळे प्रदूषणासारखा गंभीर विषय सोडवण्यासाठी केजरीवालांनी केलेल्या आवाहनाला इतर सरकारं आणि राजकीय पक्ष कशापद्धतीनं प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!