‘या’ राज्यात आजपासून विकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू

कर्नाटकात सरकारची घोषणा; रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत नाईट कर्फ्यूची

Goan Varta Live | प्रतिनिधी

बंगळुरुः कर्नाटक सरकारने शुक्रवारी बेळगाव जिल्ह्यात नाईट कर्फ्यूसह विकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.बोम्मई यांनी ही घोषणा केली आहे. राज्यात वाढत असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचाः RBIकडून सातव्यांदा रेपो रेट ‘जैसे थे’

कर्नाटकाच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कडक सतर्कता

या लॉकडाऊन कालावधील म्हैसूर, चामराजा नगर, मंगळूर, कोडगू बेळगावी, बिदर, कलाबुर्गी आणि विजयपुरा सह कर्नाटकातील किमान ८ सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कडक सतर्कता असेल. राज्यातील कोविड-१९ परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बोम्मई यांनी शुक्रवारी आरोग्य आणि शिक्षण तज्ज्ञ, मंत्री आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन याविषयी चर्चा केली.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.बोम्मई म्हणाले….

आम्ही सध्याच्या कोविड परिस्थितीवर चर्चा केली आहे. तसंच येणाऱ्या काळात कोविड पॉझिटिव्हीटी रेटमध्ये संभाव्य वाढ किंवा घट याबद्दल अखिल भारतीय पातळीवर काही निर्देश आले आहेत, त्या आधारे आम्ही काही निर्णय घेतले आहेत, असं बोम्माई म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना बोम्मई म्हणाले, आम्ही केरळ आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये शनिवार-रविवार संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि राज्यभरात रात्री ९ ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पोलिसांना त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे.

केरळमध्ये गेल्या १० दिवसांत २०,००० हून अधिक नव्या कोविड रुग्णांची नोंद

सध्या कर्नाटकात रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी सुरू आहे. केरळमध्ये गेल्या १० दिवसांत २०,००० हून अधिक नव्या कोविड रुग्णांची नोंद होत आहे. या वाढीनंतर कर्नाटकने केरळ आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना दोन्ही लसी घेतलेल्या असल्या तरी कोविड निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल सादर करणं बंधनकारक केलं आहे.

केरळ, महाराष्ट्रातून येणाऱ्या व्यक्तींनी कोविड निगेटिव्ह आरटी-पीसीआर प्रमाणपत्र सादर केलं पाहिजे, जे ७२ तासांपेक्षा जुनं नसावं. विमान, बस, रेल्वे आणि वैयक्तिक वाहतुकीद्वारे कर्नाटकात दाखल होणाऱ्या प्रवाशांना ही अट लागू आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | TRIBAL BHAVAN| १३ ऑगस्टला ट्रायबल भवनाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!