कणकवली पोलिसांनी पकडली अवैध दारू

1 लाख 42 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करत गोवा बनावटीची अवैध दारू पकडलीये. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी रंगेहात पकडलंय. यावेळी तब्बल ४ लाख ४२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. २ एप्रिलला मध्यरात्री ही कारवाई केल्याचं समजतंय.

हेही वाचा – पणजीनंतर आणखी एका ठिकाणी मद्यधुंद चालकाचा कहर, 8 जणांना चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू

अशी पकडली कार…

कणकवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात यांना गोवा बनावटीची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली 2 एप्रिलला मध्यरात्री हायवेवर सापळा रचला होता. गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी संशयित वॅगनार कार (GA-09-D-2020) दिसताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र कार न थांबताच सुसाट तळेरेच्या दिशेने गेली. ए.एस.आय. बापू खरात, वाहतूक पोलीस संदेश आबीटकर, रुपेश गुरव यांनी कारचा थरारक पाठलाग करून तळेरे येथे कार पकडली.

हेही वाचा – चित्तथरारक! बाईक, बिबट्या आणि लक्षवेधी फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

1 लाख 42 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कारमध्ये 37 बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या हनी गाईड ब्रॅण्डिंच्या 1 हजार 776 दारूच्या बाटल्या सापडल्यात. अवैध दारूची किंमत सुमारे 1 लाख 42 हजार 80 रुपयांची एवढी असल्याचं समजतंय. यात सचिन प्रभाकर वेळीप (वय 30, रा. गोवा) याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!