सतत ट्विट करून वाद करणं कंगनाला पडलं भारी

कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट बरखास्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत ही तिच्या वादग्रस्त ट्विटरमुळे कायमच चर्चेत असते. पण आता कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. कंगना रणावतने नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तिचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

मायक्रो-ब्लॉगिंग साइटच्या नियमांविरूद्ध ट्विट पोस्ट

मायक्रो-ब्लॉगिंग साइटच्या नियमांविरूद्ध ट्विट पोस्ट केल्यानंतर कंगणा रणावतचं ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रीने ट्वीटच्या मालिकेत भाष्य केलं होतं.

हेही वाचाः दमाग्रस्तांना कोरोना संसर्गाची जोखीम

मोदींना आवाहन

राज्यात नुकत्याच झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीच्या नेतृत्वात कंगनाने पश्चिम बंगालमध्ये अध्यक्ष पदाची मागणी केली. काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलं होतं की ममता बॅनर्जी यांचा झंझावात रोखण्यासाठी तुमचं विराट रूप दाखवा. या ट्वीटवरून चर्चेला तोंड फुटलं होतं.

हेही वाचाः LOCKDOWN | डिचोलीत 5 दिवस पूर्ण लॉकडाऊन

ममता बॅनर्जी म्हणजे रक्ताला चटावलेली राक्षसीण

पश्चिम बंगालमधील निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर कंगनाने ट्वीटरच्या माध्यमातून त्यावर भाष्य केलं होतं. बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराच्या बातम्यांसंदर्भातही ती बोलली होती. बंगाल व्हॉयलेन्स या हॅशटॅगसह तिने लिहिलं की ‘ममता बॅनर्जी म्हणजे रक्ताला चटावलेली राक्षसीण आहे.’

चिथावणीखोर वक्तव्य केल्यास ट्विवटर अकाउंट रद्द

चिथावणीखोर वक्तव्य केल्यास ट्विवटर अकाउंट रद्द केलं जातं. ट्विटरने यांसदर्भात नियम सांगितले आहेत. एखाद्या विषयावर खुलेपणाने बोलता यावं हा ट्विटरचा हेतू आहे. हिंसा, शोषण आणि अशा स्वरुपाच्या आक्षेपार्ह वर्तनामुळे लोकांना बोलण्यापासून परावृत्त केलं जातं. यामुळे जागतिक संवादाचं व्यासपीठ ही संकल्पनाच मोडीत निघते. आमच्या नियमाप्रमाणे सर्व युझर्सनी खुलेपणाने चर्चेत सहभागी व्हावं आणि मोकळेपणाने बोलावं, असा ट्विटरचा नियम आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!