कणकवली कोविड सेंटरमध्ये गलथान कारभार

कोविड रुग्णांना दिलं जातंय निकृष्ट दर्जाचं जेवण; रुग्णांनी केली तक्रार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ३० मार्च पासून सुरू झालेल्या कणकवलीतील कोविड सेंटरमध्ये सध्या १८ रुग्ण उपचार घेतायत. या रुग्णांमध्ये महिलांचाही समावेश आहे. या सर्वांना मागील दोन दिवस निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याची घटना समोर आलीये. या रुग्णांनी जेवणात सुधारणा करण्याची विनंतीही केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय.

हेही वाचा – दुसरी लाट नाही तर काय? 24 तासांत तब्बल 90 हजार नवे रुग्ण, 250पेक्षा जास्त मृत्यू

म्हणून जेवण टाकलं कचरा पेटीत…

शनिवारी रात्रीच्या सुमारास या कोविड सेंटरमधील रुग्णांनी जेवण निकृष्ट असल्याचं सांगत ते कचऱ्याच्या डब्यात टाकलं. रुग्णांच्या सांगण्यानुसार आमटीत डाळी नसून फक्त पाणीच असतं. एकाच प्रकारची आमटी पुन्हा दिली जाते. जेवणामध्ये मीठही घातलेलं नसतं. हे जेवण खण्यायोग्य नसल्याचं म्हणत रुग्णांनी ते सरळ कचरा पेटीत टाकलंय.

हेही वाचा – हृदयद्रावक! अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त! आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

कोविड सेंटरमधील कर्मचारी वर्ग, डॉक्टर्स, नर्सेस हे रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेत नसल्याचा आरोपही रुग्णांनी केलाय. वेळेवर औषध – उपचार रुग्णांना मिळत नसल्याची तक्रार रुग्णांनी केलीये. योग्य वेळी सकस आहार मिळत नसल्याची लेखी तक्रार मेलरॉय डिसोझा, रमेश उबाळे, सुमित तांबे, वि.एन.वरक, सुनील नाईक, एम.एस.वाडेकर, बी.ए.आडने, भिमराव जाधव, सायली जाधव, रुपा जाधव, मायावती जाधव, विवेक निखाडे, स्वरेश सावंत, शशिकांत सावंत, स्वप्निल देवरुखकर यांनी कणकवली वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!