#JusticeForKiranRajput ट्रेन्ड होण्यामागची सगळी गोष्ट

किरण राजपूतचा आत्महत्या करतानाचा धक्कादायक व्हिडीओ

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : आपला देश किती विचित्र आहे, हे अधोरेखित करणाऱ्या घटना सातत्यानं समोर येत असतात. अशापैकीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. ट्वीटवर सध्या #JusticeForKiranRajput हा ट्रेन्ड जोरात चालतोय. हजारो लोक किरण राजपूतला न्याय मिळावा म्हणून ट्वीट करत आहेत.

कोण आहे किरण?

किरण राजपूत. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील एका गरिब घरातली मुलगी. तिनं एक व्हिडीओ ट्वीट केलाय. या व्हिडीओमध्ये किरणच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही आहेत. ती ढसाढसा रडतेय. सरकारवर गंभीर आरोप करते आहे. पुरावे आहेत, पण गरिबाला आपल्या देशात कुणीही विचारत नाही, असं म्हणत तिनं मृत्यूला कवटालळंय.

आपल्या हाताची नस या तरुण मुलीने कापली. रक्तानेच चिट्ठी लिहिली. माझ्या मृत्यूला सरकार प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप किरणने केलाय. आईची, मित्रमैत्रिणींची तिनं माफी मागितली आहे.

का केली आत्महत्या?

एशिएनन्यूजने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे. १६ एप्रिलची घटना आहे. डझनभर गुंड किरणच्या घरात घुसले आणि त्यांनी तिच्या वडिलांची हत्या केली. लहान भावालाही मारहाण केली. ज्यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली.

असं का घडलं?

किरण राजपूत ज्या ठिकाणी राहत होती, तिथे असलेल्या काही उडाणटप्पू तरुण रोज शिवीगाळ करत होते. राजपूत यांच्या घरासमोरच या तरुणांची हुल्लडबाजी सुरु होती. असं करु नका, असं जेव्हा या तरुणांना सांगितलं, तेव्हा ते ऐकले नाही. त्यानंतर त्यांनी राजपूत कुटुंबावर हल्ला केला आणि किरणच्या पित्याची हत्या केली.

पोलिस, सरकार कुठंय?

या घटनेनंतर किरण सातत्यानं मध्य प्रदेश सरकारला साद घातलेतय. दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी करतेय. पण प्रशासनाच्या दुर्लक्षापुढे हतबल झालेल्या किरणने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलाय.

आत्महत्येला जबाबदार कोण?

प्रशासनात असलेल्या काही अधिकाऱ्यांनी त्यांचे जबाब बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर घटनेला वेगळाच रंद देत दोषींची फायदेशीर होईल अशाप्रकारे चार्जशीट तयार केल्याचाही आरोप तिनं केलाय. किरणने आपल्या 15 साक्षीदारांसह पोलिस अधिकारी आर एन चौहान यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसंच आर एन चोहान भष्ट्राचारी असून त्यांचे बँक बँलन्स आणि कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणीही तिनं केली आहे. इतकंच नाही तर इन्वेस्टिगेशन ऑफिसरनं आपला फोन नंबरही ब्लॉक करुन चार्जशीट बिघडवल्याचं तिनं म्हटलंय.

कारण राजकारण

शेवटचं वृत्त लिहिलं तेव्हा अठरा हजारपेक्षा जास्त जणांनी किरण राजपूत विषयी ट्वीट केले आहेत. हा विषय प्रचंड गाजतोय. अशातच मध्य प्रदेशातील राजकीय वातावरणही ढवळून निघालंय. त्यातच या घटनेने आणखी वाद होण्याची शक्यताच दाट आहे. मध्य प्रदेशात पोटनिवडणुकांवर वातावरणं तापलंय.

मध्यप्रदेशात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होते आहेत. याआधी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतलंय. त्यामुळे प्रचारही रंगला होता. दरम्यान, किरणच्या आत्महत्येने संपूर्ण मध्य प्रदेश हादरुन गेलाय. सर्वसामान्य माणसासाठी कायदा खरंच आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

वडिलांच्या मृत्यूसाठी दोषींना शिक्षा होण्यासाठी पुरावे असतानाही किरण राजपूतला आत्महत्या का करावी लागते, असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. सुशांतच्या आत्महत्यांवर बोलणारे, या अशा आत्महत्यांवर काहीच का बोलत नाही, असाही सूर सोशल मीडियात उमटतोय. सत्तेत आणि विरोधात कुणीही असो. पण या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं कुणी देणार आहे का? की आशेचा ‘किरण’ कधीचाच मावळलाय?

आत्महत्या करतानाचा व्हिडीओ आम्ही दाखवू शकत नाही. ही दृश्यं तुम्हाला विचलीत करु शकतात. मात्र त्याहीपेक्षा या व्हिडीओमध्ये किरण राजपूतने विचारलेले प्रश्न जास्त अस्वस्थ करतात. हे प्रश्न जर तुम्हाला ऐकायचे असतील, तर त्यासाठी ही लिंक… पाहा आणि विचार करा!

हेही वाचा –

करोना योद्ध्यांनाही आता सरकार माघारी पाठवणार का?

एsss शाबास! आरोग्य सेतू ऍप कुणी बनवला हे कुणालाच माहिती नाही

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!