5G प्रकरणात जुही चावलाच्या अडचणी वाढल्या

दंडाची 20 लाख रुपये रक्कम भरण्यासाठी एका आठवड्याची मुदत

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : 5G वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देणार्‍या खटल्याच्या माध्यमातून कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याबद्दल दंड म्हणून 20 लाख रुपये जमा करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला आणि इतर दोन जणांना एक आठवड्याची मुदत दिली आहे.

हेही वाचाः ‘एक दिस शेतान’ ; रिव्होल्यूशनरी गोवन्सचा कोरगाव येथे अभिनव उपक्रम

दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, या प्रकरणात याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला. हायकोर्टाने पुढे असंही म्हटलं की, या प्रकरणात असं दिसतं आहे की याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे, म्हणूनच याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली गेली. न्यायमूर्ती जीआर मिधा यांच्या खंडपीठाने आदेशात म्हटलं आहे की, हे आरोप त्रासदायक आहेत. ‘एकीकडे तुम्ही एखादा फालतू अर्ज करता आणि दुसरीकडे, तुम्ही अर्ज मागे घेता आणि किंमत देण्यासदेखील तयार नाही,’ असं देखील कोर्टाने म्हटलं आहे.

हेही वाचाः प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणाऱ्या नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी

या प्रकरणात जुही चावलाचे वकील मित मल्होत्राला यांनी म्हटलं होतं की, सदरचा दंड हा कोर्टाने रद्द करावा. या विरोधातही याचिका दाखल केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली असून, दंड भरण्यासाठी एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे.

हेही वाचाः मांद्रे गट काँग्रेसकडून समाजसेवेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न

जुहीची याचिका नेमकी काय?

जुही चावला म्हणाली की, या 5जी योजनांमुळे मानवांवर गंभीर, अपरिवर्तनीय परिणाम होतो आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचं कायमचं नुकसान होण्याचा धोका आहे. अ‍ॅडव्होकेट दीपक खोसला यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली होती की, 5 जी तंत्रज्ञान मानवजातीसाठी, पुरुष, स्त्री, प्रौढ, लहान मुलं, अर्भक, प्राणी आणि सर्व प्रकारच्या जीव-जंतुंसाठी सुरक्षित आहे का हे स्पष्ट करावं.

हेही वाचाः एंटरटेन्मेंट सिटी प्रकल्प पर्यावरण, गोंय, गोंयकारपण संभाळून होईल

आपला अजेंडा 5 जीवर बंदी घालण्याचा नसल्याचंही जुहीने स्पष्ट केलं होतं. ती म्हणाली की, लोकांचा गैरसमज आहे की, आम्ही 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला सर्वांना हे स्पष्ट सांगायचं आहे की, आम्ही 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध नाही. तथापि, आम्ही केवळ सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना अपील केलं की, 5 जी तंत्रज्ञान सर्व मानवजातीसाठी, पुरुष, स्त्रिया, मुले, वृद्ध लोक, प्राणी सुरक्षित आहे का? याचं उत्तर देण्यात यावं.

हेही वाचाः किनारी क्षेत्र आराखड्यासाठी फेर जनसुनावणी गुरुवारपासून

कोर्टाचा निर्णय

अभिनेत्री जुही चावला हिला 20 लाखांचा मोठा दंड ठोठावत दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (4 जून) 5G रोल आऊटविरोधातील तिची याचिका फेटाळून लावली. इतकंच नाही तर कोर्टाने जुही चावलाला आणखी एक मोठा धक्का दिला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं की, या प्रकरणात याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला.

हेही वाचाः …आणि भर कोर्टात दिलीपकुमार म्हणाले, ‘होय, मधुबाला मला आवडते !

हायकोर्टाने पुढे असंही म्हटलं की, या प्रकरणात असं दिसतं आहे की याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे, म्हणूनच याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली गेली. न्यायमूर्ती जीआर मिधा यांच्या खंडपीठाने आदेशात म्हटलं आहे की, हे आरोप त्रासदायक आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!