JOB ALERT | देशातील दोन कंपन्यांमध्ये मेगाभरतीचा प्लॅन

टीसीएस आणि इन्फोसिस करणार 66 हजार पदांची भरती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या देशावर लॉकडाऊनची टांगती तलवार असल्यामुळे अनेकांचे रोजगार आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. कोरोनामुळे उत्पन्नाचे स्रोत आटल्याने अनेक कंपन्यांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. परिणामी अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्डाड कोसळली आहे. मात्र, या परिस्थितीमध्येही भारतातील टीसीएस आणि इन्फोसिस  या  आघाडीच्या आयटी कंपन्यांसाठी मात्र सुगीचे दिवस आलेत. भारतातील टीसीएस आणि इन्फोसिस या दोन आघाडीच्या कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळातही मेगाभरतीचा प्लॅन आखला आहे.

टीसीएस करणार 40 हजार पदांची भरती

https://bc79b55104a454a6e57ccfbf6dc5d314.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत टीसीएसला जबरदस्त नफा झाला होता. आगामी काळासाठीही कंपनीला अनेक प्रोजेक्टस मिळाली आहेत. त्यासाठी टीसीएसकडून 40 हजार पदे भरली जाणार आहेत. टीसीएस बाजारपेठ आणि कॅम्पस इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारांनी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

इन्फोसिस कंपनीत 26 हजार पदांची भरती

भारताची दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिस 2021-22 या आर्थिक वर्षात कॅम्पसमधून 26000 फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा एट्रिशन रेट 15 टक्के होता. जुलै 2021 पासून कंपनीने सेकंड परफॉर्मेन्स रिव्ह्यूला सुरुवात करणार आहे. मागणी वाढत असताना एट्रिशन रेटमध्ये वाढ झाल्यामुळे नव्या पदांची भरती करण्यात येणार असल्याचे इन्फोसिसकडून सांगण्यात आलंय. 26 हजार नोकरदारांपैकी भारतीय कॉलेजमधून 24 हजार तरुणांना नोकरी देण्यात येणार आहे. तर एक हजार कर्मचारी हे फ्रेशर्स असतील. याशिवाय, परदेशातही काही कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. 2020-21 मध्ये इन्फोसिस कंपनीने कॅम्पस इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून 19 हजार जणांची भरती केली होती.

कंपनीच्या नफ्यात 17 % वाढ

दरम्यान, इन्फोसिसने नुकताच मार्च तिमाहीचा निकाल जाहीर केला होता. मार्च तिमाहीत कंपनीला 5076 कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत यात 17.10 टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीत कंपनीला 4321 कोटी रुपयांचा नफा झाला होता. ऑपरेटिंग रेव्हेन्यू 26311 कोटी रुपये होता, तर 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीची एकूण कमाई 1 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!