EDUCATION | NEET-PG नंतर आता ‘ही’ परीक्षा पुढे ढकलली

देशाचे शिक्षण मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: देशाचे शिक्षण मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे एप्रिल महिन्यात होणारी जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक पब्लिक नोटीस जारी करून सांगितलं आहे की, एनटीई चार सत्रात जेईई (मेन)-2021 आयोजित करत आहे. तिची दोन सत्र झाली आहेत. पहिलं सत्र 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं, तर दुसरं सत्र 16 मार्च ते 18 मार्चच्या दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं. मात्र, आता कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती पहाता एप्रिल महिन्यात 27,28 आणि 30 तारखेला होणारं सत्र स्थगित करण्यात आलं आहे.

15 दिवस अगोदर जाहीर करणार नवीन तारीख

एनटीएने सांगितलं की, या सत्रात आयोजित होणाऱ्या परीक्षेची तारीख परीक्षेच्या 15 दिवस अगोदर जाहीर केली जाईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षार्थीना सल्ला दिला आहे की, त्यांनी या वेळेचा उपयोग परीक्षेची तयारी आणखी चांगली करण्यासाठी करावा. विद्यार्थी NTA Abhyas App च्या द्वारेसुद्धा अभ्यास करू शकतात. विद्यार्थी परीक्षेबाबत कोणत्याही माहितीसाठी NTA ची बेबसाइट www.nta.ac.in किंवा www.jeemain.nta.nic.in वर व्हिजिट करू शकतात. याशिवाय विद्यार्थी 011-40759000 वर फोन करूनसुद्धा संपर्क करू शकतात आणि ईमेल- [email protected] च्या द्वारेसुद्धा माहिती घेऊ शकतात.

NEET PG परीक्षा लांबणीवर

वाढत्या कोरोना विषाणू संसर्गामुळे 18 एप्रिलला होणारी NEET PG परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आली होता. त्यामुळे जेईई मेन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!