Jammu & Kashmir: कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार…

शस्त्रास्त्र आणि दारूगोळा व्यतिरिक्त पाकिस्तानी चलनही जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ ही कारवाई करण्यात आली. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. 2 एके-47 शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांमध्ये 4 हातबॉम्ब असा स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या जवानांनी ही संयुक्त कारवाई केली.
हेही वाचाःचार जणांच्या आंतरराज्य टोळीला कळंगुट पोलिसांकडून अटक…

शस्त्रास्त्र, दारूगोळा, पाकिस्तानी चलन जप्त

पोलिसांनी सांगितले की, रविवारी माछिल सेक्टरमधील टेकरीनार भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी आव्हान दिले. या गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा व्यतिरिक्त पाकिस्तानी चलनही जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचाःInd vs Aus 3rd T20 : भारताचा मालिका विजय, सूर्यकुमार-विराटची शानदार खेळी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!