आयटी रिटर्न्ससाठी ही आहे नवीन तारीख

केंद्र सरकारकडून मुदतवाढ, वैयक्तिक करदाते तसंच व्यावसायिकांनाही दिलासा

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः करोनाने लादलेल्या निर्बंधामुळं आयटी रिटर्न्स (IT Returns) भरता नाही आलेत, तर चिंता करू नका. गर्दीची ठिकाणं टाळण्यासाठी तुम्ही कागदपत्रं जमवली नाहीए किंवा कार्यालयात जाण टाळलंय, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सरकारनं रिटर्न्स भरण्याची मुदत वाढवलीय. आर्थिक वर्ष 2019-20 साठीच आयकर भरण्याची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा करण्यात आलीय. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सरकारनं सामान्य करदात्यांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलंय.

काय म्हणते अधिसूचना


वैयक्तिक आयटी रिटर्न्स भरण्यासाठी यापूर्वीची मुदत 31 जुलै 2020 होती. आता सरकारनं अधिसूचना जारी करून वरील आर्थिक वर्षासाठीची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवलीय. यापूर्वी मे महिन्यात सरकारनं अधिसूचना जारी करताना आयकर भरण्यासाठी 31 जुलैच्या तारखेत वाढ करून 30 नोव्हेंबर पर्यंत तारीख निश्चित केली होती.

आणखी कोणाला दिलासा


सरकारनं केवळ वैयक्तिक आयकरदात्यांनाच दिलासा दिलेला नाहीए तर ऑडिटची आवश्यकता असलेल्या व्यावसायिकांना ज्यात त्यांच्या पार्टनर्सचा समावेश असतो, अशांनाही आयकर भरण्यास मुदतवाढ दिली आहे. आधी 31 ऑक्टोबर पर्यंतची मुदत आता 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा

सेक्स रॅकेटच्या सूत्रधाराला क्राईम ब्रँचकडून बेड्या

फेसबुकवर जपून! शिकारी खुद जहाँ शिकार हो गया… कसं ते वाचा!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!