IS THIS A ONE STEP CLOSER TO ‘WHITE REVOLUTION 2.0’ ? हे आहे भारतातील पहिले क्लोन्ड देशी संकरीत (गिर) गायीचे वासरू ‘गंगा ‘ , NDRI कडून माहिती प्रसारित

ऋषभ | प्रतिनिधी
मुर्राह म्हशीच्या क्लोनिंगमध्ये यश मिळाल्यानंतर येथील राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेच्या (एनडीआरआय) शास्त्रज्ञांनी गीर, साहिवाल आणि लाल शिंदी या देशी गायींचे क्लोनिंग करण्याचे काम सुरू केले व त्यांना वर्षभरात यश प्राप्त झाले आहे . याच प्रयत्नाचे फळ म्हणून 32 किलोग्रॅम वजनाची ‘गंगा’ नावाची भारतातील पहिली क्लोन केलेली गीर मादी बछडी जन्माला आली आणि आता ती चांगली वाढत आहे, अशी माहिती राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेने सोमवारी एका निवेदनात दिली.
देशातील देशी गायींचे संवर्धन आणि वाढ हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. शास्त्रज्ञांनी गीर आणि साहिवालवर काम सुरूच ठेवले असून येत्या काही दिवसांत ते लाल शिंदीवरही काम सुरू करतील.

गायींच्या देशी जाती वाढवणे हा उद्देश
- देशातील देशी गायींचे संवर्धन आणि वाढ हा या प्रकल्पामागील उद्देश आहे.
- सध्या शास्त्रज्ञांनी गीर आणि साहिवालवर काम सुरूच ठेवले असून येत्या काही दिवसांत ते लाल शिंदीवरही काम सुरू करतील.
NDRI ला 2009 मध्ये क्लोनिंगमध्ये पहिले यश मिळाले जेव्हा त्यांनी मुर्राह म्हशीचे पहिले क्लोन केलेले बछडे तयार केले. तथापि, पहिले वासरू केवळ सहा दिवस जिवंत राहिले परंतु नंतर, शास्त्रज्ञांनी 30 पेक्षा जास्त क्लोन केलेले बछडे तयार केले, ज्यांनी नंतर नैसर्गिकरित्या निरोगी मुलांचे पुनरुत्पादन केले.
देशी प्राणी रोग-प्रतिरोधक आहेत आणि ते देशातील उष्ण आणि दमट हवामानास अनुकूल आहेत. 2014 मध्ये, केंद्र सरकारने स्वदेशी जातींच्या विकास आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM) सुरू केले होते. हा उपक्रम सदर मिशनचेच एक पुढचे पाऊल पुढे आहे. या उपक्रमाच्या उद्दिष्टाविषयी बोलायचे झाल्यास अस्सल देशी गुरांची संख्या कमी होत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. हे लक्षात घेऊन NDRI ने देशी गुरांचे क्लोन विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, NDRI ने काम सुरू करण्यासाठी उत्तराखंड पशुधन मंडळासोबत सामंजस्य करार केला आहे.

डॉ नरेश सेलोकर, डॉ अजय अस्वाल, डॉ मनोज कुमार सिंग, डॉ एस एस लथवाल आणि तांत्रिक अधिकारी डॉ सुभाष कुमार यांचा समावेश असलेले शास्त्रज्ञांचे पथक या प्रकल्पावर काम करत आहे.
“देशी गुरांच्या सोमॅटिक सेलसह भ्रूण विकसित केले जात आहे आणि एकदा ते विकसित झाल्यानंतर ते वासराची प्रसूती करण्यासाठी सरोगेट मदरकडे हस्तांतरित केले जाईल. आता आमच्या योजनेनुसार सर्व काही घडले असून , संस्थेला गिर, साहिवाल यांच्या संकरातून पहिले क्लोन बछडे यशस्वीरित्या मिळाले आहे ,” डॉ एम एस चौहान म्हणाले, एनडीआरआयचे संचालक, जे म्हशीचे जगातील पहिले क्लोन केलेले बछडे विकसित करणार्या शास्त्रज्ञांपैकी एक होते.