मुंबईत जायचा विचार करत असाल तर ही आकडेवारी तुमच्यासाठीच!

मुंबईत सगळं सुरु होतंय? कोरोनाची भीती गेली?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात सगळीकडूनच पर्यटक यायला सुरुवात झाली आहे. अशातच मुंबईतूनही अनेक पर्यटक येऊ लागले आहेत. मात्र राज्यातीलही अनेकांना काही ना काही कामानिमित्त मुंबईत जायचं आहे. अशांसाठी कोरोनाची माहिती घेणं हे फार महत्त्वाचं आहे. मुंबईत मेट्रो सुरु झाली आहे. लोकल सुरु करण्यासाठीचेही प्रयत्न सुरु आहेत. नेमकं सगळं सुरु होत असताना आता मुंबईत जाणं, सुरक्षित आहे की नाही, त्यासाठी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकणं फार महत्त्वाचं आहे.

रिकवरी रेट काय सांगतो?

1 नोव्हेंबरपर्यंत तरी मुंबईचा रिकवरी रेट 90 टक्क्यांच्या आत आलेला नाही. देशाचा रिकवरी रेट 90च्या पुढे गेलाय. मात्र मुंबईत अजूनही रिकवरी रेटमध्ये म्हणावी तशी सुधारणा झाल्याचं चित्र नाही. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हादेखील मुंबईत जवळपास नऊशेपेक्षा जास्त रुग्णांचं निदान झालंय. तर पंधराशेहून जास्त रुग्ण बरे झालेत. मुंबईचा रिकवरी रेट वाईट नसला तरी तो कमी असल्याचं जाणकार सांगतात. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आहे 89 टक्के. मुंबईत सध्या 18 हजारपेक्षा जास्त एक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

31 ऑक्टोबरला किती रुग्णांचं निदान मुंबईत झालं होते, त्यावरही एक नजर टाकुयात. शनिवारी मुंबईत 993 म्हणजेच जवळपास 1 हजार नवे रुग्ण आढळून आले होते. तर 680 रुग्ण बरे झाले होते. शनिवारी मुंबईचा रिकवरी रेट 88 टक्के इतका होता. तर शुक्रवारी म्हणजे 30 तारखेला अकराशे पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले होते.

आतापर्यंत किती जण बरे झाले?

रविवारी मुंबईत एक हजार 716 रुग्ण बरे झालेत. तर आतापर्यंत दोन लाख 29 हजार 538 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत 18 हजार 26 एक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत जावं की नाही?

देशात कोरोनाची दुसरी लाट येणार असलाया इशारा आयसीएमआने दिलाय. हाच इशारा मुंबईलाही लागू आहे. अशात परिस्थितीत सध्यातरी मुंबईत जाण्याचा बेत आखणं हे घाईचं ठरू शकतं. तातडीची कामं नसल्यानं किंवा टाळता येण्यासारखं असेल तर मुंबई म्हणजे जाण्याचं प्लानिंग सध्यातरी न केलेलंच बरं, असं सध्या येत असलेल्या आकडेवारीवरुनतरी दिसतं.

सोबतच मुंबईवरुन येणाऱ्यांच्या संपर्कात न येणं, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. राज्यात येऊ घातलेल्या पर्यटक जर मुंबई, दिल्ली वरुन असल्याचं लक्षात आलं तर त्यांच्या सोशल डिस्टन्सिंग मेन्टेन करणं, हेच सध्यातरी फायद्याचं राहणार आहे.

हेही वाचा –

कडक सॅल्युट! ‘त्या’ वाहतूक पोलिसाच्या संयमाचं रहस्य जाणून घ्या

EXCLUSIVE | दातांनी नारळ सोलणारी मल्टिटॅलेंटेड शब्दुले

नारायण ! नारायण..! खुद्द पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल

(या बातमीमध्ये वापरण्यात आलेला फोटो भूषण कोयंडे यांनी काढलेला आहे.)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!