Aadhaar Card वरील मोबाइल क्रमांक अपडेट करायचा आहे का?

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्ली: आधार कार्ड सध्याच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. शिवाय तुमच्या आधार कार्डावरील तपशील अपडेटेड असणंही आवश्यक आहे, आधार जारी करणारी संस्था UIDAI देखील वेळोवेळी याबाबत ग्राहकांना सूचना देत असते. दरम्यान तुम्हाला आधार कार्डवरील मोबाइल क्रमांक अपडेट करायचा असेल इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून ही सेवा अगदी तुमच्या दारापर्यंत दिली जाते आहे. आयपीपीबी आधार कार्डवरील मोबाइल क्रमांक अपडेट करण्याची सुविधा लाँच केल्याची घोषणा केली आहे. तुमच्या गावातील पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवकाच्या मदतीने तुम्हाला ही सेवा मिळणार आहे.
हेही वाचाः नेरुल येथे अर्भक टाकणाऱ्या संशयित वृद्धास अटक
पोस्टमनकडून सेवा मिळणार अगदी डोअरस्टेप
आधार कार्डावरील मोबाइल क्रमांक अपडेट करण्याची सेवा तुम्हाला पोस्टमनकडून अगदी डोअरस्टेप मिळेल. आयपीपीबीने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये याबाबत माहिती दिली आहे. ही सेवा आयपीपीबीच्या 650 शाखा आणि 1,46,000 पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.
हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 12 हजारांनी वाढ
मुलांची नावनोंदणी करण्याची सेवाही पुरवली जाणार
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या, आयपीपीबी केवळ मोबाइल क्रमांक अपडेट करण्याची सेवा देत आहे. मात्र लवकरच या नेटवर्कद्वारे मुलांची नावनोंदणी करण्याची सेवाही पुरवली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. याशिवाय काही बँकिंग सेवा देखील पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांकडून पुरवल्या जातात.
हेही वाचाः देशात 67.6% लोकांमध्ये अँटीबॉडीज
UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘UIDAI ने आधारशीसंबंधित सेवा सुलभ करण्याच्या सततच्या प्रयत्नातून आयपीपीबी पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या माध्यमातून रहिवाशांसाठी डोअरस्टेप मोबाइल अपडेट सेवा आणली आहे. एकदा रहिवाशांचे आधार अपडेट झाले की त्यामुळे रहिवाशांना विशेष मदत होईल, यूआयडीएआयच्या बर्याच ऑनलाईन अपडेटेट सुविधा आणि अनेक शासकीय कल्याणकारी सेवांचा ते लाभ घेऊ शकतील.