IPL 2021: मुंबई इंडियन्सने जिंकलं मन! परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार मायदेशी

विदेशी खेळाडूंना मुंबई इंडियन्सचा दिलासा, घरपोच विमानसेवा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः करोना संकटामुळे आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. आयपीएल पुन्हा कधी आणि कुठे खेळवायचं याचा निर्णय नंतर परिस्थितीनुसार घेतला जाईल असं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं. आयपीएल स्थगित झाल्याने खेळाडू आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. यावेळी अनेक परदेशी खेळाडूंना निर्बंधांमुळे मायदेशी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने परदेशी खेळाडू सुखरुप मायदेशी पोहोचावेत यासाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली आहे. Cricbuzz ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

विदेशी खेळाडूंना मुंबई इंडियन्सचा दिलासा

मुंबई इंडियन्स आपल्या संघातील परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार आहे. ही विमानं दक्षिण आफ्रिकामार्गे न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजसाठी उड्डाण करतील. मुंबई इंडियन्स संघात ट्रेंट बोल्ट, अडम मिलने, जेम्स नीशम, शेन बाँड अशा न्यूझीलंडमधील अनेक खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने इतर संघातील परदेशी खेळाडूंनाही सोबत येण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.

हेही वाचाः कोरोनाने केलं ‘आयपीएल’ला क्लिन बोल्ड!

हेही वाचाः आयपीएलचे ऑफिशियल पार्टनर म्‍हणून अपस्‍टॉक्‍सची निवड

२४ तासांत निघणार विमान

दरम्यान एक विमान पोलार्ड राहत असलेल्या त्रिनिदादसाठी उड्डाण करणार आहे. हे विमान दक्षिण आफ्रिका मार्गे वेस्ट इंडिजला जाणार आहे. क्विंटन डी कॉक आणि मॅक्रो जेनसनसहित दक्षिण आफ्रिकाचे अनेक खेळाडू यावेळी आपल्या मायदेशात पोहोचतील. हे विमान २४ तासांत निघणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!