गोवा-कर्नाटक म्हादई वादः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली कायदेशीर-तांत्रिक तज्ज्ञांची बैठक

तामिळनाडू, गोव्यासोबत म्हादईच्या पाणी वाटपाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी रणनीती आखली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई यांनी गुरुवारी कर्नाटकातील कायदेशीर आणि तांत्रिक तज्ञांसोबत बैठक घेऊन तामिळनाडू, गोव्यासोबत म्हादईच्या पाणी वाटपाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी रणनीती आखली.

हेही वाचाः CRIME|मडगावात दोन ठिकाणी चोरी, तर मटका प्रकरणी एकाला अटक

कायदेशीर संघाशी सविस्तर

बोम्मई यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं की, तमिळनाडू-कर्नाटक-गोवा या राज्यांमध्ये म्हादई नदीच्या पाण्याच्या विवादाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या बाबींवर कायदेशीर संघाशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.”

कर्नाटक भवनात बैठकीचं आयोजन

कर्नाटक भवनात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीनंतर बोम्मई म्हणाले, त्यांनी बुधवारी ज्येष्ठ अधिवक्ता मोहन खत्री आणि गुरुवारी सकाळी श्याम दिवाण यांची भेट घेतली आणि चालू पाणी तंटे पाहता पुढील वाटचालीवर चर्चा केली. पुढे बोम्मई म्हणाले, पुढील वेळी सुनावणीसाठी सूचीबद्ध केल्यावर राज्य सरकारची भूमिका समोर मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचाः मुकेश अंबानी तयार करताहेत कोविड 19 प्रतिबंधक लस

मेकेदातू येथे जलाशयाच्या प्रस्तावाला तामिळनाडू सरकारचा कडाडून विरोध

कर्नाटकने रामनगर जिल्ह्यातील मेकेदातू येथे जलाशयाचा प्रस्ताव दिला आहे, परंतु तामिळनाडू सरकारने त्याला कडाडून विरोध केला आहे.

हेही वाचाः ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी पुण्यातील एका महिलेचं तब्बल 8 लाखांचं नुकसान

याव्यतिरिक्त बोम्मई म्हणाले की, म्हादई नदीवरील कळसा-भंडुरा प्रकल्पावरील वाद देखील चर्चेत आला. ते म्हणाले की हे प्रकरण 2 सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध आहे. विशेष अनुमती याचिकेच्या मुख्य मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.

हा व्हिडिओ पहाः Siddhi Naik Death case | Crime | पोलिसांच्या चौकशीतून दररोज नवनवीन माहिती समोर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!