बायको महापौर आणि नवरा विरोधी पक्षनेता! आहे की नाही इंटरेस्टिंग?

पती पत्नी ते महापौर-विरोधी पक्षनेते

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राजकारणात नाती, घराणेशाही असे विषय चवीनं चर्चीले जातात. पेडणे पालिकेत सख्खी नाती निवडणुकीच्या रिंगणात उतरणं, काणकोणात पतीपत्नी निवडणुकीला उभे राहणं आणि पडणं, या गोष्टी ताज्या असतानाच आता पहिल्यांदाच एक अजब राजकीय योगायोग घडून आला आहे. हा राजकीय योगायोग घडलाय, गोव्याशेजारील महाराष्ट्रात. महाराष्ट्रात जळगावातील हा अजब प्रकार तुफान गाजतोय.

जळगावात एक अजब योगायोग पाहायला मिळालाय. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग पाहायला मिळालाय. एकाच घरातील दाम्पत्याचा राजकीय योगायोग पाहायला मिळाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपकडे अडीच वर्ष असलेली सत्ता शिवसेनेने खेचून जळगाव महापालिकेवर भगवा फडकवलाय.

इंटरेस्टिंग राजकारण

भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्यांचे पती सुनील महाजन हे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद पत्नीकडे, तर विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे महापौर आणि विरोधी पक्षनेतेपद हे एकाच पक्षाकडे आहे.

२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७५ पैकी ५७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. शिवसेनेला अवघ्या १५ जागा मिळाल्या होत्या. एमआयएमच्या तीन जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेला मिळाले. शिवसेनेचे सुनील महाजन विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पाडत आहेत. बंडखोर नगरसेवकांना अद्यापही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच राहिले आहे.

या राजकीय योगायाोगामुळे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे. एकाच कुटुंबात दोन पक्षाचे नेते कार्यरत आहे. त्यामुळे या राजकीय योगाची जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या या नवरा -बायकोचे फोटो तुफान व्हायरल होतायत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!