अमानुष! नाकापर्यंत मास्क नव्हता घातला म्हणून लाथाबुक्क्यांनी हाणलं, व्हिडीओही समोर

धक्कादायक घटनेचा व्हिडीओही समोर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोनाला रोखण्यासाठी मास्क घातला पाहिजे. नव्हे घातला’च’ पाहिजे. अगदी प्रत्येकानं. तोही नीट. म्हणजे नाक आणि तोंड दोन्ही झाकलं जाईल असा. पण इंदूर पोलिसांनी नाकाखाली मास्क घालणाऱ्याला ज्या प्रमाणं बळजबरी केली आहे, ते पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.

मध्य प्रदेशातलं इंदौर शहर तर तुम्हाला माहिती असेलच. या इंदौरमद्ये पोलिसांनी एका क्रॉसरोडवर कुष्णा केयर नावाच्या व्यक्तीला अमानुष मारहाण केली आहे. त्याचा व्हिडीओही तुम्हाला खाली पाहायला मिळू शकले. या मारहाणीचं जे कारणं सांगितलं जातंय, ते चक्रावून टाकणारं आहे. नीट मास्क न घातल्यामुळे या व्यक्तीला पोलिसांनी अमानुषपणे लाथा बुक्क्यांनी अक्षरशः तुडवलंय.

पोलिस या व्यक्तीला तुडवत असताना त्याचा मुलगा ओक्साबोक्शी रडत होता. आपल्या वडिलांना होणारी मारहाण थांबवली जावी म्हणून याचना करत होता. पण पोलिसांनी जराही ऐकलं नाही. याच घटनेचा व्हिडीओ वायरल होता, मारहाण करणाऱ्या दोन्ही पोलिसांनी निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

नेमका कुठला प्रकार आणि कधीचा?

इंदूरमधील परदेशीपुरा पोलिस स्टेशनची ही घटना. घटना घडली मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास. ठिकाण आहे फिरोज गांधीनगर चौक.

नई दुनिया वृत्तपत्रानुसार, 36 वर्षीय कृष्णा केयर टिफिन घेऊन घराबाहेर पडला. जेव्हा ते चौकात पोहोचल्यावर परदेशीपुरा पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांनी त्यांना रोखलं. मास्क आपल्या नाकावर योग्यरित्या लावला नसल्याचा ठपका पोलिसांनी लावला. त्याचा जाब विचारला. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये जावे लागेल, अशी ताकिदही दिली. कृष्णानं अनादर केल्यावर एक पोलिस दुचाकीवरुन खाली आला. त्याने कृष्णाला दुचाकीवरून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुरू केला.

कृष्णाने याचा निषेध केला तेव्हा हाणामारी सुरू झाली. दोन्ही पोलिसांनी कृष्णाला रस्त्यावरच मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि पुढे झालं, त्याचा व्हिडीओ समोर आलाय.

व्हिडिओमध्ये कृष्णाला पोलिसांनी लाथ मुक्काने बेदम मारल्याचं दिसतंय. त्याला सोडण्यासाठी कृष्णाचे कुटुंबीय ओरडत राहिले. कृष्णाचा लहान मुलगा, अंकल प्लीज … अंकल प्लीज म्हणून याचना करत राहिला. नंतर कृष्णाची मेव्हणीदेखील पोलिसांजवळ गेली आणि तिनं पोलिसांकडे विनवणी केली. पण पोलिसांनीही जराही ऐकलं नाही. या सर्व प्रकारामुळे पोलिसांच्या बळजबरीपणावर चौफेर टीका केली जातेय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!