सुशील कुमारला अखेर अटक

कुस्तीपटूच्या मृत्यूप्रकरणी फरार झाला होता

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारताला ऑलिम्पिकची दोन पदकं जिंकवून देणारा एकमेव कुस्तीपटू अशी ओळख असणाऱ्या सुशील कुमारला रविवारी अखेर अटक करण्यात आली आहे. एका युवा कुस्तीपटूच्या मत्यूप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः आरोंदा चेकपोस्ट गेले आठ दिवस अंधारात

पोलिसांनी ठेवला होता 50 हजारांचा इनाम

युवा कुस्तीपटूच्य मत्यूनंतर सुशील कुमार फरार झाला होता. त्यानंतर त्याच्यावर 50 हजार रुपयांचा इनामही पोलिसांनी ठेवला होता. त्याचबरोबर त्याला अटकपूर्व जामीनही मिळाला नव्हता. रविवारी अखेर सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी पंजाबमध्ये जाऊन अटक केली आहे. सुशील कुमारला जालंधर येथून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः वाहनांच्या टायर्सबाबत नव्या नियमावलीचा प्रस्ताव

नेमकं प्रकरण आहे तरी काय, जाणून घ्या….

दिल्लीमधील छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर ही घटना घडली होती. सागर कुमार हा भारताचा एक युवा कुस्तीपटू नवी दिल्लीमध्ये सराव करत होता आणि त्यानंतर तो आपल्या भाड्याने घेतलेल्या घरी राहायला जात होता. हे भाड्याचे घर ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमारचं होतं. काही दिवसांपूर्वी या सुशील कुमारने सागरला घर सोडून जाण्यास सांगितलं होतं. पण कदाचित सागर ही रुम सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे जेव्हा मंगळवारी रात्री सागरचा सराव संपला तेव्हा स्डेडियमबाहेर हा सुशील कुमार सागरशी बोलण्यासाठी तिथे आला होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये भांडण झालं. यावेळी सुशील कुमारबरोबर काही अन्य व्यक्तीही होत्या आणि त्यांनी सागरला मारहाण केली. या मारहाणीमध्ये सागर गंभीररीत्या जखमी झाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचाः योगगुरु रामदेव बाबांविरुद्ध गुन्हा दाखल करा

व्हिडिओमध्ये सुशील कुमार झाला स्पॉट

सागरबरोबर असलेल्या मित्रांनाही यावेळी दुखापत झाली आहे. मंगळवारी रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी पोलिसांना तीन व्यक्ती गंभीर असून त्यांना विनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं समजलं. पोलिसांनी लगेच या ठिकाणी धाव घेतली. यावेळी सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समजलं. त्याचबरोबर सागरबरोबर असलेल्या दोन मित्रांनाही जबर मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी एका व्हिडीओमध्य सुशील कुमार तिथे असल्याचं पाहिलं गेलं होतं. त्यामुळे दिल्ली पोलिस त्याला पकडण्याची तयारी करत होते. पण सुशील कुमार हा फरार झाला होता. अखेर सुशील कुमारला पंजाबमध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!