अभिमानास्पद! भारतीय वंशाचा जस्टिन नारायण ठरला ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सीझन 13’चा विजेता!

भारताची मान उंचावली; भारतीय वंशाचा विजेता होणारा दुसरा स्पर्धक; २०१८ मध्ये साशी चेलिहा या भारतीय वंशाच्या स्पर्धकाने जिंकला होता शो

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः या वर्षीच मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया त्यातील स्पर्धकांमुळे फार गाजलं. सोशल मीडियावर या शोच्या छोट्या छोट्या क्लिप खूप व्हायरल झाल्यामुळे  ऑस्ट्रेलियासह भारतातही या शोचा विजेता कोण होणार याची चर्चा रंगली होती. अखेर सगळ्यांना मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सीझन १३ चा विजेता भेटला. स्पर्धेत दमदार कामगिरी करत जस्टिनने शोची ट्रॉफी आपल्या नावे केली. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सीजन १३ चा विजेता जस्टीन नारायण हा भारतीय वंशाचा आहे. त्यामुळे भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत यात शंका नाही. जस्टीन नारायण हा भारतीय वंशाचा विजेता होणारा दुसरा स्पर्धक ठरला. याआधी २०१८ मध्ये साशी चेलिहा या भारतीय वंशाच्या स्पर्धकाने शो जिंकला होता.

कोण आहे जस्टिन नारायण?

सत्तावीस वर्षाचा नारायण हा पश्चिम ऑस्ट्रेलियाचा आहे. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया अकाउंटवरून प्रसारित केलेल्या व्हिडिओनुसार त्याला स्वयंपाकासाठी फिजीयन आणि भारतीय हेरीटेज प्रेरित करते. जस्टिनने शोमध्ये  चिकन करी, लोणचे कोशिंबीर, इंडियन चिकन टाकोज, चारकोल चिकन विथ टॉम, आणि फ्लॅटब्रेड अशा बर्‍याच भारतीय व्यंजनांद्वारे परीक्षकांना प्रभावित केलं. जस्टिनने वयाच्या १३व्या वर्षी स्वयंपाक करण्यास सुरवात केली. जस्टिनची आई ही त्याची सर्वात मोठी प्रेरणा आहे.

जस्टिनचे स्वप्न काय आहे?

जस्टिनला स्वतःच रेस्टॉरंट उघडायचं आहे. ज्यामध्ये भारतीय व्यंजनं असतील. या रेस्टॉरंटमधून कमवलेल्या पैशातील एक भाग भारतातील वस्तीमध्ये राहणाऱ्या मुलांच्या खाण्यासाठी आणि शिक्षणासाठी द्यायची त्याची इच्छा आहे.

मास्टरशेफ ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय पाककृतींचा तडका!

मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी कुकिंगची स्पर्धा आहे. ही स्पर्धा गेल्या १३ वर्षांपासून सुरू आहे आणि यातून जगभरातील अनेक प्रसिद्ध लोक तयार झाले आहेत. अनेकांची स्वतःची मोठी रेस्टॉरंटही आहेत. सुरुवातीला, मास्टरचेफ ऑस्ट्रेलियामधील इतर सर्व स्पर्धांप्रमाणेच, फक्त हॉटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या रेसिपीलाच प्राधान्य दिलं जात होतं.  परंतु आता हे बदलत आहे. आता जगातील या सुपरहिट फूड शोमध्येही भारतीय पाककृती बघायला मिळत आहेत.

हा व्हिडिओ पहाः Video | RAJAN EXPOSED AJGAVKAR | गोव्यातल्या केंद्राच्या दत्तक गावातच मुलभूत सुविधांचा अभाव

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!