भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना करोनाची लागण

चंडीगढ येथील निवासस्थानी झाले आयसोलेट

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांची चाचणी करण्यात आली होती, ती पॉझिटिव्ह आल्याने चंडीगढ येथील निवासस्थानी त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे.

हेही वाचाः ‘एचसीसीबी’कडून दक्षिण गोव्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

माझी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मी हैराण

फ्लाइग सिख या नावाने प्रसिद्ध असलेले ९१ वर्षीय मिल्खा सिंग यांना करोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. आमच्या काही कर्मचाऱ्यांना करोना झाला, त्यामुळे आम्ही कुटुंबातील सर्वांनी चाचणी करून घेतली. त्याच फक्त माझी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मी हैराण झालो आहे, मिल्खा सिंग म्हणाले.

हेही वाचाः खतांवरील अनुदान वाढवण्याचा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

चाहत्याचे प्रेम आणि प्रार्थनेमुळे मी लवकर बरा होईन

माजी प्रकृती पूर्णपणे ठिक आहे. ताप किंवा कफ नाही. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार ३-४ दिवसात मी ठिक होईन. कालच मी जॉगिंग केल्याचे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. याआधी मला करोनाची लस घेण्याची गरज वाटत नव्हती. पण आता जाणीव झाली की ती घेतली पाहिजे आणि अन्य सर्वांनी देखील ती लवकर घ्यावी. संपूर्ण देशातील चाहत्याचे प्रेम आणि प्रार्थनेमुळे मी लवकर बरा होईन असे ते म्हणाले.

हेही वाचाः 18-44 वयोगटातून लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

मिल्खा सिंग यांची कारकीर्द

मिल्खा सिंग यांनी १९६०च्या रोम ऑलिंपिकमध्ये ४०० मीटर फायनलमध्ये चौथ्ये स्थान मिळवलं होतं. मिल्खा सिंग यांनी १९६०च्या रोम ऑलिंपिकमध्ये ४०० मीटर फायनलमध्ये चौथ्ये स्थान मिळवलं होतं. तर १९५८ आणि १९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळवलं. मिल्खा यांचे पुत्र जीव मिल्खा सिंग गोल्फपटू आहेत. ते सध्या दुबईत असून पुढील आठवड्यात भारतात परत येणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!