आशियाई बॉक्सिंग स्पर्धा; संजीतचा गोल्डन पंच!

अटीतटीची लढत; अमित-थापाला रौप्य पदक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भारताचा बॉक्सर संजीत याने हेवी वेट गटात देशाला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिलीये. 91 किलो वजनी गटातील फायनल सामन्यात संजीतने ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट वासिली लेविट याला पराभूत केलं. तत्पूर्वी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील गतवर्षीचा चॅम्पियन अमित पंघल याचा यंदाच्या वर्षीचा सुवर्ण पंच हुकलाय. अटितटीच्या झालेल्या फायनल लढतीत त्याला रिओ ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट जोइरोव शाखोबिदीन याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचाः ट्विटरविरोधात गुन्हा; चुकीची माहिती दिल्याचा आरोप

अमित-थापाला रौप्य पदक

या पराभवामुळे त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावं लागलं. अमितने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये एकतर्फी विजय नोंदवणाऱ्या अमितने अंतिम सामन्यात कडवी झुंज दिली. पण अखेर त्याला पराभवाचा सामना करावा लागला. अमितने उज्बेकिस्तानच्या जोइरोव शाखाबिदीनविरुद्धच्या सामन्यात अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. त्याला 2-3 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. शिप थापाने 64 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं.

हेही वाचाः चक्रीवादळात घरांचे नुकसान

आत्तापर्यंत भारताने जिंकली सर्वाधिक पदकं

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि यूएई बॉक्सिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग टीमने विशेष छाप सोडली आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. 2019 मध्ये बँकॉक येथे पार पडलेल्या स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग टिमने 13 पदक (2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य) जिंकत तिसरे स्थान पटकावलं होतं.

()

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!