चीनची आता खैर नाही! सीमेवर T-90, T-72 रणगाडे तैनात

युद्धसज्ज रनगाडे तैनात केल्यामुळे सीमेवर घडामोडींना वेग

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

लडाख : भारत आणि चीनमध्ये संबंध आणखी ताणले जाणार की काय, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांमध्ये सुरु आहे. कारण भारताीय सैन्यानं लडाखमध्ये आपल्या हालचालींना वेग आणला आहे. पूर्ण लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये प्रचंड तणाव आहे. अशातच भारताने आता T-90 आणि T-72 रनगाडे तैनात केले आहे. भारतीय लष्कराने पूर्व लडाखमधील LACवर रणगाडे तैनात केलेत. युद्धसज्ज रनगाडे तैनात केल्यामुळे सीमेवर घडामोडींना वेग आला आहे.

काय आहे T-90 आणि T-72 रनगाड्यांची खास बात
-40 अंश तापमानातही ऑपरेट करणं शक्य
-आगामी थंडीच्या काळात होणार मोठा फायदा

पावसाळा संपत आला असून आता हळूहळू लडाखमधील तापमान वेगानं कमी होईल. या संभाव्य तापमानाचा विचार करता लष्कराने हे रनगाडे सीमाभागात तैनात केले आहेत. तसंच लष्कराकडून उच्च कॅलरीयुक्त आणि न्यूट्रीशन असलेलं रेशनही पोहोचवण्यात आलेलं आहे. इंथन, तेल, थंडीचे कपडे, वातावरण गरम ठेवण्यासाठी उपकरणं, अशी सर्व यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचंही सांगितलं जातंय.

महत्त्वाचं म्हणजे थंडीच्या दिवसात तापमान कमी असल्यानं रणगाड्यांचा सांभाळ करणं, त्यांचा चालवणं, हे एक मोठं आव्हान असतं. थंडीच्या दिवसात तापमाना उणे 35 पेक्षाही खाली जाण्याची शक्यता असते. अशा कठीण वातावरणात बंदुका, रणगाडे, शस्त्रास्त्र आणि युद्धसाठी वापरली जाणारी वाहनांचा मेन्टेनन्स हे जिकरीचं काम असतं. मात्र हे आव्हान पेलण्यासाठी फायर एन्ड फ्युरी कॉर्प्सची तुकडी तैनात करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

गेले अनेक महिने भारत आणि चीनमध्ये कमांडर पातळीवर चर्चा सुरु आहे. मात्र तरीही सीमाप्रश्नी कोणताही तोडगा निघालेला नाही. अशातच भारतानं आता आक्रमक भूमिका घेतली असल्याचं लष्कराच्या हालचालींवरुन दिसून येत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!