2 वर्षांनंतर नॅशनल हायवेवर एकही टोल नसणार, नितीन गडकरी म्हणाले की…

टोलमुक्तीचा नवा नारा नेमका कसा आहे?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देश टोलमुक्त करण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. देशाला पुढच्या दोन वर्षात टोलमुक्त करण्याचा सरकारचा प्लान असल्याचं त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाचं म्हणजे नव्या जीपीएस आधारीक कलेक्शन सिस्टममुळे देशाला टोलमुक्त करण्याचा प्लान गडकरींनी मांडलाय. यामुळे देशातील टोलबुध पूर्णपणे हद्दपार होऊन वाहतुकीचा वेग वाढेल, असाही विश्वास व्यक्त केला जातोय. थेट बँक अकाऊंटमधून टोलचे पैसे कापले जातील, असं आधुनिक प्रणाली अवलंबली जाणार आहे.

यासाठी एक जीपीएस सिस्टम शेवटच्या टप्प्यात आहे. या आधुनिक टोलप्रणालीमुळे टोलच्या देखभालीचा खर्चही कमी होऊन उत्पन्न वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

सध्या सर्वच कर्मशिअल वाहनं ही ट्रॅकिंग सिस्टमसह येतात. सोबतच जुन्या वाहनांसाठी जीपीएस प्रणाली लावण्याचा सरकारचा बेत आहे. त्यासाठीची योजनाही लवकरच आणली जाणार आहे. ही प्रणाली अवलंबल्यानंतर देशात 5 वर्षात 1,34,000 कोटींनी वाढेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केलाय. तसंच टोल वसुलीत पारदर्शकता येईल, असंही त्यांनी म्हटलंय. आता येत्या दोन वर्षात खरंच ही प्रणाली अवलंबली जाते का, हे पाहणं महत्त्वाचंय. विशेष म्हणजे नॅशनल हायवेची वाहतूक खरंच यामुळे वाढते का, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!