मोठी बातमी | भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

‘या’ दिवशीपासून सुरु होणार सामने; बीसीसीआयने दिली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: भारतीय क्रिकेट संघ सध्या नवनिर्वाचित कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका क्रिकेट संघाला त्यांच्याच भूमित मात देण्यासाठी श्रीलंकेला पोहोचला आहे. संघातील सर्व खेळाडूने आवश्यक तो विलगीकरणाचा कालावधी संपवून सराव सामने देखील खेळले आणि 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाले होते. पण तितक्यात कोरोनाच्या संकटामुळे सामन्यांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात येणार आहे.

हेही वाचाः Royal Enfield च्या चाहत्यांना धक्का, Bullet 350 सह लोकप्रिय बाईक्स महागल्या

श्रीलंका क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव

श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार होता. पण कोरोनाच्या शिरकावामुळे आता श्रीलंका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता पहिला एकदिवसीय सामना 18 जुलैला खेळवला जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला यावेळी सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि जी. टी. निरोशान यां दोघांची कोरोना टेस्ट पॉजीटिव्ह आली. त्यामुळेच संपूर्ण श्रीलंका संघाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सोबतच सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघालाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे.

हेही वाचाः दोनपेक्षा अधिक मुले असल्यास कुटुंब गमावणार हे सरकारी लाभ

असे असेल नवे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना – 18 जुलै
  • दुसरा एकदिवसीय सामना –  20 जुलै
  • तिसरा एकदिवसीय सामना – 23 जुलै
  • पहिला टी-20 सामना –  25 जुलै
  • दुसरा टी-20 सामना –  27 जुलै
  • तिसरा टी-20 सामना –  29 जुलै
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!