IND vs ENG : नॉटिंगहॅममध्ये पुन्हा पावसाचा खेळ

एका षटकानंतर खेळ स्थगित

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. खराब वातावरण आणि पावसामुळे सामना लवकर थांबवण्यात आला. तत्पूर्वी इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव आपल्या नियंत्रणात आणला होता. या सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियासाठी चांगला ठरला होता. कारण भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 183 धावांवर रोखलं होतं. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियासाठी चांगलीच ठरली. सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल मैदानावर तग धरुन खेळत होते. पण लंचब्रेक आधीच्या षटकात रोहित शर्मा बाद झाला. भारताची 97 धावावर रोहित शर्माच्या रुपात पहिली विकेट पडली.

हेही वाचाः सत्तरीत डोंगर कोसळल्याने जैविक संपत्तीचं नुकसान

लंचब्रेक नंतर भारतीय संघाला उतरती कळा

लंचब्रेक नंतर भारतीय संघाला उतरती कळाच लागली. कारण काही धावांच्या अंतरावर भारताचे एकामागेएक असे मातब्बर शिलेदार तंबूत जाताना दिसले. विशेष म्हणजे इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अडरसन याने कर्णधार विराट कोहली याला शून्यावर तंबूत पाठवलं. त्यानंतर बेअरस्टोने अजिंक्य राहणे याला धावबाद केलं. एकीकडे विकेट पडत होत्या दुसऱ्या बाजूने केएल राहूल एकेरी कमान सांभाळण्याच्या प्रयत्नात दिसला. तो ऋषभ पंतसोबत डाव सावरण्याचा प्रयत्नात होता पण पावसाने खेळात व्यत्यय आणला. अखेर खेळ तात्पुरता थांबवण्यात आला. आज तिसऱ्या दिवशी भारतीय संघ कालच्या 4 बाद 124 पासून पुढे खेळायला सुरुवात करेल.

हेही वाचाः एक कोटीच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण

पहिला दिवस टीम इंडियाचा

इंग्लंडच्या नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. त्यातील पहिल्या सामन्याचा पहिला दिवस बुधवारी (4 ऑगस्ट) पार पडला. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करत आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे मातब्बर फलंदाज मैदानावर फार काळ तग धरु शकले नाहीत. अखेर भारतीय गोलंदाजांनी त्यांना 66 षटकात थांबवलं. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव हा 65.4 षटकात 10 बाद 183 धावांवर थांबला. टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ मोहम्मद शमीने 3 तर शार्दुल ठाकूरने 2 आणि मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.

हेही वाचाः सासष्टी तालुक्यात सर्वाधिक ५१२ मुंडकार खटले प्रलंबित

दुसऱ्या दिवशी पावसाचा खेळ

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सुरुवातीला भारतीय सलामीवीरांनी संयमी खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी 97 धावांची सलामी दिली. त्यानंतर मात्र ठराविक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत गेले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताची 4 बाद 125 अशी अवस्था केली होती. त्यानंतर लोकेश राहुल आणि रिषभ पंतने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्राचा खेळ रद्द करण्यात आला.

हेही वाचाः पुरामुळे धारबांदोड्यात दोन कोटींचं नुकसान

हा व्हिडिओ पहाः Video | GOA DAIRY | चेअरमन आणि एमडींचे परस्परविरोधी दावे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!