नवे टेन्शन; दिल्लीतील एम्समध्ये बर्ड फ्लुमुळे देशातील पहिला मृत्यू

११ वर्षीय मुलाचा मृत्यू; रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दिल्ली एम्समधील सर्व कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून केलं आयसोलेट

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः देश करोना महामारीच्या संकटाचा सामना करत असताना आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतात H5N1 एवियन इन्फ्लुएंजा म्हणजे बर्ड फ्लूने पहिल्या मृत्युची नोंद झाली आहे. बर्ड फ्लूने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यानंतर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या दिल्ली एम्समधील सर्व कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून आयसोलेट करण्यात आलं आहे.

हेही वाचाः Aadhaar Card वरील मोबाइल क्रमांक अपडेट करायचा आहे का?

दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षांच्या या मुलाला 2 जुलै रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या मुलाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा हरियाणामधील होता. एनसीडीसीच्या एका पथकाला या गावात पाठवण्यात आलं आहे. 

हेही वाचाः देशात 67.6% लोकांमध्ये अँटीबॉडीज

देशात अजूनही करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. केरळमध्ये झिका व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. केरळमध्ये आतापर्यंत झिका व्हायरसचे ३९ रुग्ण समोर आले आहे. आता बर्ड फ्लुमुळे एका मुलाच्या झालेल्या मृत्युने सरकार समोर नवीन आव्हान निर्माण झालं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | POT HOLES | MERCES JUNCTION | मेरशी जंक्शनवरील रस्त्यावरील खड्डे धोकादायक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!