CORONA UPDATE | भयंकर! देशातील कोरोना मृतांचा आकडा पुन्हा वाढला

गेल्या 24 तासात ३ हजार 523 इतके विक्रमी मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरात झपाट्याने पसरत आहे. त्याचबरोबर कोरोना मृतांचा आकडाही वाढतो आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाचे तब्बल 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 रुग्ण आढळले आहेत, तर 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मृतांचा आकडादेखील 2 लाखाच्या पार गेला असून 32 लाख 68 हजार 710 सक्रिय रुग्ण आहेत. 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. गेल्या 24 तासांतील कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या ही जवळपास 3 हजाराच्या वर आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी चिंता व्यक्त केली जातेय.

गेल्या 24 तासात ३ हजार 523 इतके विक्रमी मृत्यू

देशात गेल्या २४ तासात 4 लाख 1 हजार 993 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ हजार 523 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 2 लाख 99 हजार 988 जण कोरोनातून बरे होऊन त्यांना डिश्चार्ज देण्यात आलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची आकडेवारी जाहीर केली आहे, तर एएनआयने याविषयी ट्विट करून माहिती दिली आहे.

काळजी घ्या, सुरक्षित रहा

देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जातेय. रोज कोरोनाची वाढती प्रकरण आणि कोरोनामुळे वाढणारी मृतांची संख्या ही चिंताजनक आहे. कोरोनाला जर पळवून लावायचं असेल, तर आपणच स्वतःची काळजी घ्यावी लागेल. यासाठी मास्क वापरणं, सॅनिटायझर लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!