CORONA UPDATE | शुक्रवारी देशातील कोरोना बाधितांचा आकडा चार लाखाच्या पार

गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 4,187 रुग्ण देशभरात दगावले, तर नव्या 4 लाख 1 हजार 78 रुग्णांची भर

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः करोनानं संपूर्ण देशाला आपल्या कवेत घेतलं आहे. रोजच्या रोज करोनाबाधित रुग्णांचा आकडा नकोसे विक्रम प्रस्थापित करत आहेत. गेल्या 24 तासात 4 लाख 1 हजार 78 जणांना करोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी देशातील कोरोना मृतांचा आकडा हा 4 हजाराच्या पार गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी देशातील कोरोना आकडेवारी

शुक्रवारी देशात 4 लाख 1 हजार 78 जणांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय. तर 3 लाख 18 हजार 609 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा हा घाबरवणारा आहे. शुक्रवारी जवळपास 4 हजार 187 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

विक्रमी आकडेवारी

आतापर्यंत देशात 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 79 लाख 30 हजार 960 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 2 लाख 38 हजार 270 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या 37 लाख 23 हजार 446 करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. करोनाचं संकट दूर करण्यासाठी आतापर्यंत 16 कोटी 73 लाख 46 हजार 554 जणांचं लसीकरण केलं असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य खात्यानं दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!