CORONA UPDATE | बापरे! देशात 24 तासांत ३ हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्याही 3 लाखाच्या पार

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरात झपाट्याने पसरत आहे. त्याचबरोबर कोरोना मृतांचा आकडाही वाढतो आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाचे तब्बल 1 कोटी 87 लाख 62 हजार 976 रुग्ण आढळले आहेत, तर 1 कोटी 53 लाख 84 हजार 418 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. मृतांचा आकडादेखील 2 लाखाचा पार गेला असून 15 कोटी 22 लाख 45 हजार 179 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. गेल्या 24 तासांतील कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या ही जवळपास 3 हजाराच्या वर आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी चिंता व्यक्त केली जातेय.

गेल्या 24 तासात ३ हजार ४९८ इतके विक्रमी मृत्यू

देशात गेल्या २४ तासात ३ लाख ८६ हजार ४५२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ हजार ४९८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३१ लाख ७० हजार २२८ अँक्टिव रुग्ण आहेत. याविषयी एएनआयने ट्विट करून माहिती दिली आहे.

काळजी घ्या, सुरक्षित रहा

देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जातेय. रोज कोरोनाची वाढती प्रकरण आणि कोरोनामुळे वाढणारी मृतांची संख्या ही चिंताजनक आहे. कोरोनाला जर पळवून लावायचं असेल, तर आपणच स्वतःची काळजी घ्यावी लागेल. यासाठी मास्क वापरणं, सॅनिटायझर लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!