जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मंजूरी

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करुन दिली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

नई दिल्ली: जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोसच्या लसीला भारतात मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती ट्वीट करुन दिली आहे.  मांडवीय यांनी   ट्वीट करत म्हटलं आहे की, भारताने आपली लस बास्केट वाढवली आहे.  जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे 5 EUA लस उपलब्ध आहे. यामुळे आपल्या देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.  

हेही वाचाः पत्नीच्या आरोपांवर हनी सिंहचं जाहीर उत्तर

अमेरिकेत दिली होती स्थगिती

जॉन्सन अँड जॉन्सनची लस घेतल्यानंतर सहा महिलांच्या रक्तामध्ये गाठी तयार झाल्याची तक्रार आल्यानंतर अमेरिकेने या लसीच्या वापराला एप्रिल महिन्यात तात्पुरती स्थगिती आणली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येणार असल्याचं अमेरिकेच्या सेन्टर फॉर डिसीज कन्ट्रोल आणि फूड अँड ड्रग एडमिनीस्ट्रेशनच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आलं होतं.

हेही वाचाः ‘नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात’

जॉन्सन अँड जॉन्सनची लस घेतल्यानंत केवळ रक्ताच्या गाठीच तयार होत नाहीत तर सोबत रक्तातील प्लेटलेट्सही कमी होत आहेत अशी तक्रार आली आहे आणि हे खूप धोकादायक आहे असं प्रशासनाने सांगितलं होतं. या घटनेनंतर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या वापरावर तात्पुरती स्थगिती आणण्यात आली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | MOPA #LINK#ROAD| तुळस्करवाडी ग्रामस्थ बनले आक्रमक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!