दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत घट

गेल्या 24 तासांत 1 लाख 636 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर 2 हजार 427 जणांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसत आहे. रविवारी देशात 1 लाख 14 हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले होते. तर 2 हजार 677 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर आज देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. देशात 24 तासांत 1 लाख 636 नवे कोरोनाबाधित आढळले असून 2 हजार 427 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 1 लाख 74 हजार 399 जण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 कोटी 89 लाख 9 हजार 975 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 49 हजार 186 जणांचा मृत्यू झाला असून 2 कोटी 71 लाख 59 हजार 190 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचाः भारतीय तटरक्षक दलाने गोवा किनाऱ्यावर पुरवली तातडीची वैद्यकीय मदत

एवढ्या भारतीयांनी घेतली लस

सध्या देशात 14 लाख 1 हजार 609 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसंच आतापर्यंत देशभरात 23 कोटी 27 लाख 86 हजार 482 जणांचं कोरोना लसीकरण पार पडलं आहे.

6 जूनपर्यंत एवढ्या झाल्या चाचण्या

6 जूनपर्यंत देशभरात 36 कोटी 63 लाख 34 हजार 111 नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात 15 लाख 87 हजार 589 नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

corona-eps
corona-eps
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!