कोरोना रुग्णवाढ 1 लाखाच्या आत! 66 दिवसानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण

मृत्यू घटले मात्र संख्या लक्षणीय

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात गेल्या 2 महिन्यातली निचांकी रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यापासून कोरोना रुग्णवाढीचा आलेख उतरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीतून मोठा दिलासा व्यक्त केला जातो आहे.

गेल्या 24 तासांत आढळून आलेल्या नव्या रुग्णांची संख्या ही 90 हजारपेक्षाही कमी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांच्या दुप्पटपेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत नवे 86 हजार 498 रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 लाख 82 हजार 282 रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत.

हेही वाचा : गोव्यात अनलॉक प्रक्रिया कधीपासून? मुख्यमंत्र्यांनी सांगितली ‘ही’ तारीख

मंगळवारी देण्यात आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण बाधितांच्या संख्या आता 2 कोटी 89 लाख 96 हजार 473 इतकी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 73 लाख 41 हजार 462 बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला देशात एकूण 13 लाख 3 हजार 702 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. गेल्या 24 तासांत 97 हजार 907 इतक्या मोठ्या संख्येने सक्रिय रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात आली आहे.

Corona Covid 19 India Tally

मृत्यू घटले, पण…

कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी मृत्यूदराचं प्रमाण अपेक्षेइतकं कमी झालेलं नाही. गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा 2 हजार पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 2 हजार 123 रुग्णांनी जीव गमावलाय. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ही आता साडेतीन लाखाच्या पार गेली आहे. देशात आतापर्यंत एकूण 3 लाख 51 हजार 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूदर आटोक्यात आणण्याची डोकेदुखी अजूनही कायम आहे.

हेही वाचा : केमिकल कंपनीला भीषण आग ; 18 कामगारांचा होरपळून मृत्यू !

पाहा खास व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!