चिंताजनक! २४ तासांत पुन्हा ३ हजार ३०० पेक्षा जास्त कोरोना बळी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णवाढीची चिंता काहीशी कमी झाली आहे. रुग्णवाढीत सातत्यानं घट दिसून येते आहे. मात्र मृत्यू अजूनही कमी होत नसल्याचं चिंता व्यक्त केली जाते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाणतही वाढल्याचं दिसून आलंय. त्यामुळे दिलासा व्यक्त केला जातोय.

रुग्णवाढीला ब्रेक!
देशभरातली कोरोना रुग्णवाढीला कमालीचा ब्रेक लागल्याचं जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच दिसून आलं आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा दर वाढत चाललाय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गेल्या २४ तासांत देशात १ लाख २० हजार ५२९ नव्या कोरोना रुग्णांची भर देशात पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा हा आता २ कोटी ८६ लाख ९४ हजार ७९ वर पोहोचलाय.
हेही वाचा : म्युकरमायकोसिसपासून बचावासाठी स्टिरॉईडसचा अतिरेक टाळावा
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात जवळपास २ लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आलाय. एकूण १ लाख ९७ हजार ८९४ कोरोना दिवसभरात बरे झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ही २ कोटी ६७ लाख ९५ हजार ५४९वर पोहोचली आहे. आताच्या घडीला देशात एकूण १५ लाख ५५ हजार २४८ सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हेही वाचा : पगाराबाबत आली मोठी बातमी! आता पगाराच्या दिवशी सुट्टी आली तरी नो टेन्शन

मृत्यूदर कायम
रुग्णवाढ घटली असली आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असलं, तरीही देशातील कोरोना बळींची संख्या आटोक्यात आलेली नाही. देशात गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा ३ हजारपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ३ हजार ३८० जणांनी कोरोनामुळे जीव गमावलाय. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ३ लाख ४४ हजार ८२वर पोहोचलाय. दरम्यान, आतापर्यंत देशातील एकूण २२ कोटी ७८ लाख ६० हजार ३१७ जणांचं लसीकरण करण्यात आल्याचीही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
हेही वाचा : 100 टक्के लसीकरण केलेलं पहिलं राज्य होण्याचं गोव्याचं उद्दिष्ट
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या शेवटापासून सुरु झालेलं कोरोना बळींचं तांडव अजूनही कमी झालेलं नाही. जून महिना उजाडला तरीही कोरोनाचा देशातील मृत्यूदर प्रचंड असल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. कोरोना दुसऱ्या लाटेचा फटका एप्रिलपासून जो सुरु झाला आहे, तो अजूनही बसताना पाहायला मिळतोय. रुग्णवाढ घटली असली आणि देशाताच रिकव्हरी रेट वाढला असला तरीही कोरोना बळी अजूनही कमी न झाल्यामुळे काळजी व्यक्त केली जातेय.
हेही वाचा : CORONA UPDATE | रुग्णवाढ घटतेय; मात्र तरीही चिंता