देशभरात रुग्णवाढीला ब्रेक! पण मृत्यू कमी कधी होणार?

देशातील कोरोना आकडेवारी काहीशी दिलासादायक

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावलाय. जून महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या दीड लाखाच्या आत आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे दिलासा व्यक्त केला जातोय.

रुग्णवाढीला ब्रेक!

देशात नव्या १ लाख ३४ हजार १५४ कोरोना रुग्णांचं निदान गेल्या २४ तासांत करण्यात आलंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जारी केली आहे. दरम्या, नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्यांच जास्त असल्याचं सातत्यानं पाहायला मिळतंय. दिवसभरात एकूण २ लाख ११ हजार ४९९ कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेटही वाढला असून सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाल्याचं दिसून आलंय.

हेही वाचा : TOP 20 | ONE LINERS | महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर

मृत्यू कमी होईनात!

सध्या देशात १७ लाख १३ हजार ४१३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. एकीकडे रुग्णवाढीचा वेग आणि बरे होण्याच प्रमाण वाढतंय. तर दुसरीकडे अजूनही मृत्यूदराची चिंता ही कायमच आहे. गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा अडीच हजार पेक्षा जास्त जणांना देशात कोरोनामुळे मृत्यू झालाय. एकूण २ हजार ८८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. देशातील कोरोना बळींची एकूण आकडा हा आता ३ लाख ३७ हजार ९८९वर पोहोचलाय.

हेही वाचा : आजपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू; वाचा कधी कुणाचं लसीकरण

गोव्यात काय स्थिती?

राज्यात बुधवारी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही दुप्पटपेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे राज्याची सक्रिय रुग्णसंख्याही घटल्याचं पाहायला मिळतंय. तसंच राज्याचा रिकव्हरी रेट हा पुन्हा एकदा 90 टक्क्यांच्या पार गेलाय.

गेल्या बुधवारी राज्यात एकूण 706 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, 706 रुग्णांपैकी 605 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 101 रुग्ण हे रुग्णालयात दाखल झालेत. दरम्यान, एकूण 3 हजार 715 कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्यानं जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे. आधीपेक्षा मृत्यू होण्याच्या प्रमाणात घट जरी झाली असली, तरीही पुन्हा एकदा गेल्या 24 तासांत एकूण 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा एकूण आकडा हा 2 हजार 693 इतका झालाय.

हेही वाचा : बारावीच्या परीक्षा अखेर रद्द तर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!