दोन डोसादरम्यानचं अंतर वाढवणार?

केंद्र सरकार ऑक्सफर्ड - ऑस्ट्राझेनेकाच्या लसीच्या दोन डोस दरम्यानचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: कोरोना महारोगराई विरोधातील युद्धात महत्त्वाची ढाल असलेल्या लसींवर जगभरात सातत्याने अभ्यास सुरू आहे. या अभ्यासाच्या आधारावर कोरोना लसीच्या वापरासंबंधी निर्णय घेतले जात आहेत. अशात केंद्र सरकार ऑक्सफर्ड – ऑस्ट्राझेनेकाच्या लसीच्या दोन डोस दरम्यानचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यासंबंधी विचारविमर्श करण्यासाठी सरकारने तज्ज्ञ समितीची नेमणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचाः फेसबूक कमेंटची मुख्यमंत्र्यांकडून दखल

तर लस अधिक प्रभावी ठरते

दोन डोसमधील वाढीव कालावधीमुळे लसीचा प्रभाव वाढतो, या अभ्यासावर समितीकडून विचार केला जात आहे. ही समिती पुढील आठवड्यापर्यंत केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने एप्रिलमध्ये कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 4 ते 6 आठवड्यांनी वाढवून 6 ते 8 आठवड्यांपर्यंत केलं आहे. कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 12 आठवड्यांनी देण्यात आला, तर ती अधिक प्रभावी ठरते, असे निष्कर्ष मार्चमध्ये नामांकित हेल्थ जर्नल लॉन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात काढण्यात आले होते.

हेही वाचाः CORONA UPDATE | शुक्रवारी देशातील कोरोना बाधितांचा आकडा चार लाखाच्या पार

दोन डोसमधील अंतर वाढल्यास दुहेरी फायदा

कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसदरम्यान अंतर वाढवलं तर भारतात दोन पातळीवर फायदा होईल. डोसमधील वाढीव अंतरादरम्यान लसपुरवठा वाढल्यानंतर किमतीत घट होईल. दुसऱ्या डोससाठी गर्दी कमी झाली, तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना पहिला डोस दिला जाऊ शकतो. अनेक देशांनी लसीकरणादरम्यान तीन महिन्यांचं अंतर ठेवलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्येला लसीकरण करणं शक्य होईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!