Income Tax लाँच करणार नवीन पोर्टल

करदात्यांसाठी कोणती सुविधा?

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: आयकर विभाग करदात्यांच्या सोयीसाठी सोमवारी नवीन ई-फायलिंग पोर्टल लाँच करणार आहे. www.incometax.gov.in ही आयकर विभागाची नवीन वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आयटीआर दाखल करण्यासह इतर सर्व महत्त्वाची कामं करता येणार आहे.

हेही वाचाः कर्नाटकात पुन्हा राजकीय नाटकं! मुख्यमंत्री बदलले जाण्याच्या चर्चांना उधाण

आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया होणार सोपी आणि सुलभ

हे नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर करदात्यांना आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ होणार आहे. तसंच यावर सर्व काम जलदगतीने करता येणार आहेत. नवीन ई-फाइलिंग पोर्टलद्वारे करदात्यांना एक आधुनिक आणि अखंड सेवा प्रदान करणे, हे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) उद्दिष्ट आहे.

हेही वाचाः दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत घट

आयकर विभागाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश

या पोर्टलमध्ये आयकर विभागाशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे करदात्यांना लवकरच परतावा मिळण्यास मदत होईल. हे पोर्टल लाँच झाल्यानतंर काही दिवसांनी इन्कम टॅक्स विभाग याबाबतचे एक नवं मोबाईल एपही सुरू करणार आहे.

हेही वाचाः भारतीय तटरक्षक दलाने गोवा किनाऱ्यावर पुरवली तातडीची वैद्यकीय मदत

ई-फायलिंग पोर्टल काय आहे?

ई-फायलिंग पोर्टल करदात्याला आयकर रिटर्न भरण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी, अपील करण्यासाठी आणि त्याचप्रकारे तक्रार नोंदविण्यासाठी, रिफंड आणि अशा बऱ्याच कामासाठी वापरता येणार आहे. आयकर विभागाकडून या पोर्टलचा वापर नोटीस पाठवण्यासाठी, करदात्याकडून उत्तर मिळवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि असेसमेंट, अपील आणि दंड यांच्या निर्णयासाठी केला जातो.

हेही वाचाः आजपासून १५ वर्षांपर्यंतच्या पालकांनाही लसीकरणात प्राधान्य

कोणकोणत्या सुविधा मिळणार?

यात सर्व अपलोड केलेली कागदपत्रे, राहिलेली कामं करदात्याला एकाच डॅश बोर्डवर दिसतील. तसंच सर्व प्रकारचे interactions आणि uploads हे एकाच डॅशबोर्डवर करता येणार आहे. त्यामुळे करदात्यांची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

नवीन आयकर पोर्टल हे आयकर रिटर्नच्या प्रोसेसिंग पोर्टलने जोडण्यात येईल. जेणेकरून करदात्याला त्वरित कर परतावा मिळेल.

आयटीआर भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सॉफ्टवेअर उपलब्ध केलं जाईल. करदात्याला आयकराचं ज्ञान नसताना आयकर भरण्यासाठी सोयीचं व्हावं म्हणून आधीच भरलेला डेटा सॉफ्टवेअरमध्ये असेल, जेणेकरून कमीत कमी डेटा भरावा लागेल.

पगार, घर मालमत्ता किंवा व्यवसायासह उत्पन्नाचा तपशील भरताना कोणताही करदाता त्यांचे प्रोफाईल सक्रियपणे अपडेट करता येणार आहे. त्याचा उपयोग आयटीआर दाखल करण्यासाठी केला जाईल.

टीडीएस आणि एसएफटी तपशील अपलोड झाल्यानंतर पगाराचे उत्पन्न, व्याज, लाभांश आणि भांडवली नफ्यासह प्री-फिलिंगची क्षमता उपलब्ध असेल.

करदात्याच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नवीन कॉल सेंटर देखील सुरू केलं जाणार आहे. करदात्यांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न, उपयोगकर्ता नियमावली, व्हिडीओ यासारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसंच इतर काही समस्या असल्यास चॅटबॉट आणि लाईव्ह एजंटशी बोलण्याची सुविधा देखील मिळेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!