मणिपूरमध्ये ५५ जवान ढिगाऱ्याखाली; ८ ठार!

भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना; बचावकार्य युद्धपातळीवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

इंफाळ : मणिपूरमध्ये गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडत आहेत. बुधवारी रात्री नोनी जिल्ह्यातील तुपूल रेल्वे स्थानकाच्या जवळच झालेल्या भूस्खलनात १०७ टेरिटोरियल आर्मी कॅम्पचे जबर नुकसान झाले. या दुर्घटनेत कॅम्पमधील ५५ जवान मातीखाली दबले गेले आहेत. रात्री ९.३० पर्यंत त्यांतील सात जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत तर, १९ जवानांना वाचवण्यात यश आले आहे. वरील घटनेनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. जखमींना मदत करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथकही घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.
हेही वाचा:गोव्याला कौशल्य विकास संस्थांची गरज… ‍

नागरिकही गाडले गेल्याची भीती

जखमींवर नोनी लष्कराच्या वैद्यकीय विभागात उपचार सुरू आहेत. भूस्खलनाचा इजाई नदीच्या प्रवाहालाही फटका बसला आहे. ही नदी तामेंगलोंग व नोनी जिल्ह्यातून वाहते. काही वृत्तांत या घटनेत सर्वसामान्य नागरिक दबले गेल्याचाही दावा केला जात आहे. एका अधिकाऱ्याच्या मते, खराब हवामानामुळे मदत कार्य राबवण्यात अडचण येत आहे. लष्कराचे हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचलेत.
हेही वाचा:महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… ‍

खालच्या भागाला मोठा धोका

जिल्हा प्रशासनाने आसपासच्या ग्रामस्थांना खबरदारीचा व लवकरात लवकर जागा खाली करण्याचा इशारा दिला आहे. भूस्खलनाच्या ढिगाऱ्यामुळे इजाई नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे एकेठिकाणी पाणी साचल्याने बंधाऱ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. हा बंधारा तुटला तर खाल्याच्या भागात मोठा हाहाकार माजू शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे. आसाम व मणिपूरसह ईशान्येतील अनेक राज्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये तर १० दिवसांपासून आतापर्यंत १३५ जणांचा बळी गेला आहे. तर लक्षावधी लोकांना फटका बसला आहे.
हेही वाचा:प्रत्येक महिला, कुटुंब आत्मनिर्भर व्हावे ! ‍

जवानांच्या कॅम्पला भूस्खलनाचा फटका

हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर व सिक्कीममध्ये पुढील काही दिवस आणखी पाऊस होण्याचा अंदाज आहे. जिरीबामला इंफाळशी जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार केला जात होता. त्याच्या सुरक्षेसाठी टेरिटोरियल आर्मीचे १०७ जवान तैनात करण्यात आले होते. मात्र, बुधवारी मुसळधार पावसामुळे जवानांच्या कॅम्पला भूस्खलनाचा फटका बसला आणि जवानांचा कॅम्प उद्ध्वस्त झाला.
हेही वाचा:जमीन हडप प्रकरणातील आणखी एक मासा गळाला ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!