भीषण! कणकवलीत असा झाला कंटेनर पलटी

जाणवली रातांबेव्हाळ येथील घटना; एक गंभीर जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गावर जाणवली रतांबेव्हाळ येथे मोठा अपघात झालाय. एक कंटेनर पलटी झालाय. सुदैवान यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

हेही वाचाः कणकवली पोलिसांनी पकडली अवैध दारू

नक्की काय झालं?

मुंबईहून गोव्याच्या दिशेने एका खाजगी कंपनीचा आयशर कंटेनर येत होता. खाण्याचे सामान घेऊन हा कंटेनर मुंबईतून गोव्याच्या दिशेने चालला होता. कणकवलीत जाणवली रतांबेव्हाळ येथे अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पटली झाला. शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान हा अपघात झाला.

हेही वाचा – पणजीनंतर आणखी एका ठिकाणी मद्यधुंद चालकाचा कहर, 8 जणांना चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू

चालक जखमी

राकेश पुजारा सिंग (वय वर्ष 24. रा. मुंबई) हा कंटेनरचा चालक या अपघातात जखमी झालाय. त्याच्यासोबत असलेला २४ वर्षीय परिक्षीत मेहता यालाही किरकोळ दुखापत झालीये. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!