कोरोना काळात काम करा आणि मिळवा सरकारी नोकरी! ‘ही’ आहे अट

मेडिकल आणि सायन्यच्या विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात मनुष्यबळ वाढवण्यासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयापैकीच एक निर्णय आहे, मेडिकलच्या लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांसंदर्भातला. मेडिकल्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थीही आता कोरोना रुग्णांवर उपचार करणार आहेत. तसा निर्णय आणि परवानगीही देण्यात आली आहे. यासोबतच अनेक महत्त्वाचे निर्णय मोदींनी बैठकीदरम्यान, घेतले आहेत.

नीट(NEET-PG) ही परीक्षा ४ महिने पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नीट परीक्षेची नवी तारीख परीक्षेच्या एक महिना अगोदर जाहीर केली जाईल, असं सांगितलं जातंय. त्याचबरोबर इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांनाही आता कोरोना रुग्णांची सेवा बजावण्याची परवानगी देण्यात आलीय. इंटर्न्स त्यांच्या वरिष्ठांसोबत राहून कोरोना रुग्णांवर उपचार करतील. फोनच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी तसंच सौम्य लक्षणं असलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी या डॉक्टर्सची मदत घेतली जाणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या डॉक्टर्स आणि नर्स यांची कमतरता भासू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

jobs

यामुळे आत्ता सेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवरचा कामाचा ताण कमी व्हायला मदत होणार आहे. पदव्युत्तर शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीही निवासी डॉक्टर्स म्हणून काम करु शकणार आहेत. त्याचबरोबर बीएससी किंवा जीएनएम हे शिक्षण घेतलेल्या नर्सना देखील कोरोना काळात वरिष्ठांच्या हाताखाली काम करण्यासाठी नेमण्यात येणार आहे.

हेही वाचा – संकटातही संधी! नर्स आणि डॉक्टर्ससाठी नोकरीची संधी

कोरोना काळात काम केल्यास सरकारी नोकरीचं गाजर?

ड्युटीचे कमीतकमी १०० दिवस पूर्ण केल्यानंतर कोरोना काळात काम केलेले हे वैद्यकीय कर्मचारी शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी पात्र ठरणार आहेत. त्यांना शासकीय सेवेत प्राधान्य देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना काळात काम केलेल्या या कर्मचाऱ्यांचं लसीकऱण करण्यात येईल तसंच भारत सरकारच्या आरोग्य सेवकांसाठीच्या इन्शुरन्स योजनेचाही लाभ घेता येईल. कमीत कमी १०० दिवस ड्युटी केल्यानंतर अशा सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भारत सरकारकडून सन्मानित करण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!