मोठी बातमी! शशी थरुरांसह 6 पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेली ट्रॅक्टर रॅली चिघळली. त्यात अनेकजण जखमी झाले. हिंसाचार झाला. यानंतर आता एक मोठी बातमी समोर येते आहे. यूपी पोलिसांनी काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यासह सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. त्याचप्रमाणे खोटी माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

देशाद्रोहाचा गुन्हा
सोशल मीडियात खोटी पोस्ट केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळेसमाजात हिंसा पसरल्याचा आरोप करण्यात त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशी थरुर आणि इतर सहा पत्रकारांच्या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
अफवेमुळे अडचणीत
नोएडाच्या एका स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या लोकांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून दावा केला होता की लाल किल्ल्यावरील घेराव आणि ट्रॅक्टर परेड दरम्यान पोलिसांनी एका शेतकऱ्याला गोळी घालून ठार मारल्याचा दावा करण्यात आला होता.
कुणाकुणावर गुन्हा?
शशी थरुर यांच्यासोबत मृणाल पांडे, राजदीप सरदेसाई, विनोद जोसे, जफर आगा, परेश नाथ आणि अनंत नाथ या पत्रकारांवर देशद्रोहाचा आणि हिंसा भडकवल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. २६ जानेवारीला दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला मंजूरी देण्यात आलेली. त्यावेळी दिल्लीत मोठा हिंसाचार झाला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 22 गुन्हे दाखल केलेत.
‘अर्णबने रेटिंग फिक्स करण्यासाठी 12 हजार डॉलर आणि 40 लाख दिले’
तणाव कायम
या संपूर्ण घटनाक्रमानंतर दिल्ली पोलिसांनी गुरुवारी गाजीपूर बॉर्डरवर प्रदर्शन करत असलेल्या शेतकऱ्यांना ती जागा सोडण्यास सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या या आदेशाला विरोध केला आहे. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी जाहीर केलं आहे की ते आत्महत्या करतील पण आंदोलन स्थळ सोडणार नाहीत. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत.
हेही वाचा – Video | राजधानीत टोकाचा संघर्ष! झटापटीची भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद
८ वर्ष जुनी गाडी वापरत असाल तर ही बातमी वाचाच!
निवडून येण्यासाठी नोकरीचं आश्वासन द्यावंच लागतं- आरोग्यमंत्री विश्वजीत राणे