ALCOHOL TRAFFICKING | अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई

सातोळी बावळट येथील घटना; २२ लाख ४ हजार ८०० चा मुद्देमाल जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: सावंतवाडी तालुक्यातील सातोळी बावळट इथं नाकाबंदी दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई केलीये. गोवा बनावटीच्या दारूच्या ५०० बॉक्सची वाहतूक या टेम्पोतून होत होती‌. समोर बॅरल लावत अगदी शिताफीने दारू वाहतूक करण्याचा प्रयत्न दारू माफियांकडून करण्यात आला. मात्र, जिल्हा वाहतूक पोलीसांनी हा डाव उधळून लावत अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई केलीये.

हेही वाचाः BREAKING | अग्नितांडव! पुणे कॅम्पमधील दुकानांचा कोळसा

२२ लाख ४ हजार ८०० चा मुद्देमाल जप्त

इंदोर येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. २२ लाख ४ हजार ८०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रात्री पावणेबाराच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आलीये. गोव्यातून नांदेड इथ ही दारू वाहतूक होत होती.

हेही वाचाः Corona +ve | आमदार बाबूश यांना कोरोनाची लागण

पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री. वटकर, पोलिस अजित घाडी, वाहतूक पोलीस विलास नर, प्रशांत धुमाळे, मयुर सावंत, श्री. संकपाळ यांनी ही धडक कारवाई केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!