बाधिताचा ३० दिवसांत मृत्यू झाल्यास ठरणार करोनाबळी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोराना बाधिताचा ३० दिवसांच्या आत हॉस्पिटलमध्ये वा हॉस्पिटलच्या बाहेर मृत्यू झाला तरी तो करोनाचा बळीच मानला जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना बळींविषवी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे केंद्राकडून राज्यांना पाठवण्यात आली आहेत.

हेही वाचाः करोना, पावसाचा व्यापाऱ्यांना फटका

९५ टक्के करोनाबाधितांचा २५ दिवसांनंतर मृत्यू

आयसीएमआर संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार ९५ टक्के करोनाबाधितांचा २५ दिवसांनंतर मृत्यू झाला आहे. बाधिताचा ३० दिवसांच्या आत हॉस्पिटलमध्ये वा हॉस्पिटलबाहेर मृत्यू झाला तरी तो करोनामुळेच मृत्यू झाल्याचं ग्राह्य धरला जाईल. मृत्यू झालेल्या रुग्णाचे कुटुंबीय मृत्यूच्या कारणाविषयी समाधानी नसतील, तर मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करावी. अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य आरोग्य अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयातील विभाग प्रमुख आणि एक तज्ज्ञ हे या समितीचे सदस्य असतील. विहित नमुन्यात समितीकडे अर्ज सादर करणं आवश्यक आहे. कुटुंबियांच्या समस्या ऐकून घेेऊन त्यावरही समितीने उपाय शोधणं आवश्यक आहे. कुटुंबियांकडून आलेल्या अर्जावर ३० दिवसांत निर्णय घेणे आवश्यक आहे.

आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याला करोनाबाधित ठरवलं जातं. करोनाबाधिताचा मृत्यू आत्महत्या वा अपघातामुळे झाला असल्यास तो करोनाबळी म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही.

राज्यात २४ तासांत आणखी दोघांचा मृत्यू

शनिवार आणि रविवार या २४ तासांत ५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुढील २४ तासांत आणखी दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबळींची संख्या ३,२१० झाली आहे. सोमवारी ६७ नवे बाधित मिळाल्याने बाधित मिळण्याचे प्रमाण १.६ टक्के आहे. सोमवारी ८० बाधितांनी करोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के आहे. सध्या ८८५ सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी बिठ्ठोण (६८) आणि केरी (७५) येथील बाधितांचा मृत्यू झाला.

हेही वाचाः RAIN UPDATE | राज्यात पावसाचा जोर वाढला

करोनावरील आणखी एका औषधाला मान्यता

औषध उत्पादक कंपनी हेटेरोच्या करोनावरील औषधाला भारतीय औधष नियंत्रण महामंडळाने मंजुरी दिली आहे. करोनावरील उपचारासाठी प्रौढांवर आपत्कालीन वापराची या औषधाला परवानगी देण्यात आली आहे. हेटेरोने याबाबतची माहिती दिली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या प्रौढांवर उपचारासाठी डॉक्टर टोसिलिझुमॅबचा (टोसिरा) वापर करू शकतात, असं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. हैदराबाद येथील हेटेरोच्या प्लांटमध्ये टोसिराची निर्मिती केली जाणार आहे. भारतात हेटेरोच्या टॉसिलिझुमॅब (टोसिरा) ला मंजुरी मिळाल्यानं आनंद झाल्याचे हेटेरो ग्रुपचे अध्यक्ष डॉ. बी. पार्थ सारथी रेड्डी यांनी सांगितलं आहे.

राज्यात १८ वर्षांहून अधिक लोकांची संख्या ११.५ लाख आहे. आतापर्यंत ११.४ लाख लोकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे. काही लोकांनी राज्याबाहेर पहिला डोस घेतला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिला डोस १०० टक्के लोकांनी घेतला असे म्हणालयला हरकत नाही, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Mopa Link Road Agitation | मोपा लिंक रोड पिडितांची आर्त हाक


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!