DELTA VARIANT | डेल्टा वेरिएंटमुळं लस घेतलेल्यांनाही संक्रमणाचा धोका

ICMRच्या अभ्यासातून उघड

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: ऑल इंडिया मेडिकल कॉऊन्सिल रिसर्चनं चेन्नईत केलेल्या एका अभ्यासामध्ये एक सर्वांना काळजीमध्ये टाकणारी बाब समोर आली आहे. कोरोना विषाणूचा डेल्टा वेरिएंट हा कोरोना लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्या व्यक्तींना बाधित करु शकतो, असा निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे. मात्र, कोरोनाच्या पहिल्या विषाणूच्या तुलनेत या विषाणू संसर्गाचा मृत्यूदर कमी असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचाः डी-मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानींचा जगातील 100 श्रीमंतांमध्ये समावेश

अभ्यासाला आयसीएमआरची मंजुरी

आयसीएमआरच्या राष्ट्रीय साथरोग संस्था चेन्नईच्या संस्थात्मक इथिक्स समितीनं या अभ्यासाला मंजुरी दिली आहे. 17 ऑगस्टला प्रकाशित झालेल्या जर्नल ऑफ इन्फेक्शनमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. प्रकाशित झालेल्या अहवालात डेल्टा वेरियंट हा लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्यांना संसर्ग करु शकतो, असं समोर आलं आहे. या वेरिएंटची संक्रामक क्षमता अधिक आहे. डेल्टा वेरिएंटमुळं भारतात दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली होती. तर, जगभरात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता.

डेल्टा वेरिएंट कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा प्रभाव कमी करत असल्याचं निदर्शनास आल्याच दिसून आलं आहे. त्यामुळे कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्ती देखील कोरोनाबाधित झाल्याचं आढळून आलं होत.

हेही वाचाः हायकोर्टाचा मोठा निर्णय, केवळ लग्न केलं म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही!

संशोधक जेरोमी थंगराज यांनी या अभ्यासासाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या कमी आहे. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देखील ससंर्ग होत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र, लस घेतलेल्या लोकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी असल्याचं जेरोमी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः गोवा ब्रांच ऑफ चार्टर्ड अकाउंट्स संघटनेने घेतली मॉविन गुदिन्होंची भेट

लस घेतलेल्यांचा मृत्यू नाही

अभ्यासामध्ये ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना संसर्गाचं प्रमाण ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांच्या पेक्षा कमी असल्याचंही अभ्यासात समोर आलं आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेत त्यांचा मृत्यू झाला नसल्याचं निरीक्षणही अभ्यासामध्ये समोर आलंय. तर, ज्यांनी लसीचा एक डोस घेतला होता आणि अभ्यासात समाविष्ट केलेल्या नमुन्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. तर, लस न घेतलेल्या 7 जणांचा मृत्यू झालाय.

हा अभ्यास मे महिन्यात करण्यात आला. तामिळनाडूच्या आरोग्य विभागाशी याची माहिती शेअर करण्यात आली आहे. चेन्नईतील तीन ठिकाणांवरुन ही माहिती गोळा करण्यात आली. एकूण 3790 जणांच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | PANDURANG MADKAIKAR| पांडूरंग मडकईकरांची सिद्धेश नाईकांवर टीका

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!