कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात

ICMR प्रमुखांचा दावा; संशोधनातून स्पष्ट; कोरोनामुक्तीनंतर 3 महिन्यांनी लस, नव्या गाईडलाईन्स जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्ड कोरोना लसीच्या पहिल्या डोसमुळे शरीरात अधिक अँटीबॉडी तयार होत असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा स्वतः इंडियान काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी केलाय. हे सांगताना त्यांनी याबाबत संशोधन झालेलं असून त्यात हे स्पष्ट झाल्याचंही नमूद केलंय. ते कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर का वाढवण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर देत होते.

हेही वाचाः धक्कादायक ! काळ्या बुरशीपाठोपाठ आता पांढऱ्या बुरशीचंही नवं संकट !

कोव्हिशिल्डबाबत नवा अहवाल समोर

कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर फार जास्त अँटीबॉडी तयार होत नाही. कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसनंतर या अँटीबॉडी तयार होतात. कोव्हिशिल्डबाबत मात्र नवा अहवाल समोर आलाय. यात कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतरच शरीरात चांगल्या प्रमाणात अँटीबॉडी तयार होत असल्याचं आढळलं आहे. ICMR ने याबाबतची आकडेवारी आणि माहिती तपासली आहे. 3 समित्यांनीही ही माहिती पाहिली आणि चर्चा केली. कोव्हिशिल्ड कोरोना लस निर्मात्यांसोबत यावर चर्चा करण्यात आलीय, असं डॉ. बलराम भार्गव म्हणाले.

हेही वाचाः परिणाम शून्य म्हणून रेमडेसिव्हीर उपचारातून वगळलं- WHO

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर किती?

ICMR चे तज्ज्ञ, 3 समित्या आणि कोरोना लस निर्मात्यांशी चर्चा केल्यानंतरच कोव्हिशिल्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये जवळपास 12 आठवड्यांचं अंतर ठेवण्याचं सूचवण्यात आलंय. कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर 4 आठवड्यांचं असणार आहे, असंही डॉ. बलराम भार्गव यांनी नमूद केलंय.

हेही वाचाः भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना करोनाची लागण

कोरोनामुक्तीनंतर 3 महिन्यांनी लस, नव्या गाईडलाईन्स जारी

NEGVAC अर्थात (National Expert Group on Vaccine Administration for COVID-19)ने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे NEGVAC ने केलेल्या सूचनांप्रमाणे एखादा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यावर त्याला 3 महिन्यांनी कोरोना लस दिली जाणार आहे. याला आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. NEGVAC ने केलेल्या सूचनानंतर एखादा व्यक्तीला कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर त्याने कोरोनामुक्त झाल्यानंतर 3 महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा. त्याचबरोबर आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोनाची लस दिली जावी असं NEGVAC ने म्हटलंय. तसंच कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांची एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.

हेही वाचाः भाजपच्या घराणेशाहीचा म्हापशेकारांना बसला फटका

लसीकरणाबाबत NEGVACच्या 4 सूचनांना मंजुरी

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला 3 महिन्यानंतर कोरोना लस दिली जाऊ शकते

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांना दुसरा डोस घ्यावा.

आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या माताही कोरोना लस घेऊ शकतात.

कोरोना लस घेण्यापूर्वी रॅपिड एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!