कर्नाटकात पुन्हा राजकीय नाटकं! मुख्यमंत्री बदलले जाण्याच्या चर्चांना उधाण

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीच दिले महत्त्वाचे संकेत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एकीकडे कर्नाटकात कोरोनाचा कहर असतानाच आता राजकीय घडामोडींनाही वेग आलाय. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात नेतृत्तव बदलाच्या वावड्या उठल्या होत्या, त्यावर महत्त्वाचं वक्तव्य मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केलं आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय घडामोडींना वेग आलाय.

काय म्हणाले येडियुरप्पा?

जोपर्यंत पक्षाच्या हायकमांडचा विश्वास आहे तोपर्यंत मी राज्याचा मुख्यमंत्री राहीन. ज्या दिवशी पक्ष मला सांगेल की, मी पक्षाला या पदावर नकोय, त्या दिवशी मी राजीनामा देईन. राज्याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करत राहिल.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले जाण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना येडियुरप्पा यांनी महत्त्वाचं वक्तव्य केल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. गेल्या आठवड्याभरापासूनच कर्नाटकात नेतृत्त्वबदल, कॅबिनेटमधील खात्यांत फेरबदल होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यावरुन येडियुरप्पा यांनी दिलेल्या उत्तरानं आता आणखीच स्पष्टता आली आहे. राजकीय हालचालींना येडियुरप्पांच्या वक्तव्यामुळे वेगही आहे.

हेही वाचा : धक्कादायक ! कोरोनाबळींच्या वारसांबरोबरही केंद्राचा असा ‘खेळ’

आणखी काय म्हणाले येडियुरप्पा?

‘मी कोणत्याही भ्रमात नाही. पक्षाने मला संधी दिली आहे. चांगल्या संधीचा उपयोग करण्यासाठी मी माझ्या शक्तीपलीकडे जावून प्रयत्न करीत आहे. बाकी सर्व काही हायकमांडवर आहे.मी कोणावरही टीका करणार नाही. पर्याय नाही याबाबत मी सहमत नाही. राज्यात आणि देशात नेहमीच पर्यायी व्यक्ती असतील. त्यामुळे कर्नाटकात पर्यायी व्यक्ती नाही हे मला मान्य नाही, परंतु जोपर्यंत हायकमांडला विश्वास आहे तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदावर कायम राहिन’

हेही वाचा : दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत घट

राजकीय हालचाली

भाजपच्या नेत्यांनी कर्नाटकातील राजकीय हालचालींचं खंडण केलंय. नेतृत्तवबदलाचे कोणतेही वारे सध्यातरी कर्नाटकात वाहत नसल्याच्या प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून दिल्या आजत आहेत. या नेतृत्त्वबदलावर कर्नाटकते भाजप अध्यक्ष नलिन कुमार कटील आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही मुख्यमंत्री पदी दुसरं कुणीतरी येईल, ही शक्यता नाकारली आहे. मात्र अशातच येडियुरप्पा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकूणच कर्नाटकचं राजकारण तपालंय.

हेही वाचा : कोविशिल्ड की कोवॅक्सिन? पहा, काय म्हणतंय संशोधन…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!