आयुष्यभर अन् आयुष्याच्या शेवटीही ‘साथ साथ…’

पतीच्या चरणात 'त्या' सावित्रीने सोडले प्राण; सावंतवाडीतील घटनेने अनेक जण हळहळले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पतीच्या निधनानंतर अवघ्या काही तासात पत्नीनेही अखेरचा श्वास घेतल्याचा प्रकार सावंतवाडीतील सालईवाडा भागात घडला. पतीचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या त्या ‘सावित्री’ने आपल्या पतीच्या चरणात प्राण सोडले. त्यामुळे हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले अनेक जण हळहळले. ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अशोक बांदेकर (८५) यांंचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी सुनिता बांदेकर (७०) यांचा रविवारी मृत्यू झाला. सावंतवाडीतील बांदेकर मेडिकल स्टोअरचे ते मालक होते.

हेही वाचाः विना सहकार आहे सरकार

पतीचं वृद्धापकाळाने, तर पत्नीचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

अशोक बांदेकर यांचं रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. दरम्यान त्यांच्या पत्नी सुनिता बांदेकर यांना हृदयविकाराचा त्रास असल्यानं त्यांना त्यांचे पती गेल्याची कल्पना देण्यात आली नव्हती. मात्र त्यांना उशिरा पतीच्या निधनाचं वृत्त सांगितल्यानंतर अंतिम दर्शन घेतानाच त्यांनी आपल्या पतीच्या पायावर डोकं ठेवलं आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केलं.

हेही वाचाः ‘सनबर्न बीच क्लब’चे बांधकाम 4 आठवड्यांच्या आत पाडा

शहरात घटनेची चर्चा

दरम्यान पती – पत्नीने एकाच दिवशी प्राण सोडल्यानं उपस्थित हेलावून गेले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेची चर्चा शहरात सुरू आहे.

हा व्हिडिओ पहाः Politics | Mandrem | आमदार दयानंद सोपटे यांची फटकेबाजी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!