भीषण ! वेंगुर्ला रामघाटात अपघातात

चारचाकी-दुचाकीत टक्कर; दोघे जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: वेंगुर्ल्यातील रामघाटात मुख्य रस्त्याच्या उतारावर अल्टो कार व दुचाकीमध्ये अपघात झालाय. दरम्यान या अपघातात कार चालक व दुचाकीस्वार जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी कुडाळातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आल्याची माहिती परबवाडा ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे यांनी दिलीये.

हेही वाचा – हृदयद्रावक! अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त! आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

कसा झाला अपघात?

कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचं समजतंय. यात कार पलटी होऊन कारचं मोठं नुकसान झालंय, तर दुचाकीचंही नुकसान झालंय. यात दुचाकीस्वार शाम देसाई (रा. परबवाडा) हे आपल्या पत्नीसह सावंतवाडीच्या दिशेने जात होते, तर चारचाकीस्वार हा वेंगुर्लाच्या दिशेने येत असताना हा अपघात झालाय. हेमंत गावडे आणि सामाजिक कार्यकर्ते भूषण आंगचेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना १०८ रुग्णवाहिकेने कुडाळ येथे हलवलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!