सीबीआय चौकशीच्या निर्णयानंतर अखेर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

हायकोर्टाच्या निर्णयमुळे अडचणी वाढण्याची भीती

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआयने प्राथमिक चौकशी करावी, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला. उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या पदावर राहणे योग्य नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगत त्यांनी राजीनामा दिल्याचे नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अडचणीत वाढ

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते. पोलिस नियुक्ती व बदल्यांसाठी गृहमंत्री देशमुख पैशांची मागणी करत. तसेच तपास कार्यातही हस्तक्षेप करतात, असे आरोप परमबीर सिंग यांनी मुख्येमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात केले होते. या सर्व आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी परमबीर सिंग यांच्यासह वकील जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्याा याचिकेमधून करण्यात आली होती.

विरोधकांचा विजय?

उच्च न्यायालयाने परबीर सिंग यांच्यासहित अन्य दोन याचिका निकाली काढत वकील जयश्री पाटील यांच्याे याचिकेवर आदेश दिला की, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण करुन १५ दिवसांमध्येच अहवाल सादर करावा. प्राथमिक चौकशीनंतर या प्रकरणी गुन्हा‍ दाखल करण्याबाबतचा निर्णय सीबीआयने घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी या राजीनाम्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!