काही क्षणात कोसळला डोंगर

हिमाचलच्या सिरमौर येथे भूस्खलनाचा थरार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गेल्या अनेक दिवसांपासून देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. पावसामुळे दरड कोसळणं, भूस्खलन होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलनाची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात भूस्खलन होऊन काही क्षणात समोर उभा असलेला डोंगर कोसळला. हिमाचल प्रदेशच्या पावटा शिलाई नॅशनल हायवे ७०७ मध्ये भूस्खलन झाल्यानं हायवे जवळपास ५० ते १०० मीटरपर्यंत खचला आहे. त्यामुळे तिथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीय. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओतून झालेल्या घटनेची दाहकता फार प्रखरशाने दिसून येत आहे.

हेही वाचाः कोरोना आणि म्युकरमधून बरा झालेल्या सचिन तुभेची गोष्ट

अतिमुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराने संपूर्ण रस्ता गिंळकृत केला. या घटनेत संपूर्ण हायवे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. भूस्खलनाचा हा थरार मोबाईलमध्ये कैद करण्यात आला काही क्षणात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हेही वाचाः ‘भूमीपुत्र अधिकारिणी कायदा’ अस्तित्वात येणं यातच या कायद्याचं महत्व

लाहोर स्पीतीमध्ये ढगफूटी

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा कहर सुरु आहे. पावसामुळे हिमाचल प्रदेशच्या विविध भागांमध्ये अनेक दुर्देवी घटन घडत आहेत. लाहोर स्पीति येथे ढगफूटी होऊन अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. यात जवळपास १७५ पर्यटक अडकले आहेत. अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचाः विद्यमान सरकार गोंयकार विरोधी परप्रांतीयांचं सरकार असल्याचं सिद्ध झालं

मंडी येथे छप्पर पडून दुर्घटना

हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे पार्किंगमध्ये छप्पर पडून मोठी दुर्घटना घडली. गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रामनगर येथील मंगवाई पार्किंगमधील छप्पर कोसळून पार्किंगमध्ये असणाऱ्या १२ गाड्यांचं मोठं नुकसान झालं. अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, अनेक गाड्यांचा वरचा भाग पूर्णपणे खराब झाला. छप्पराखाली अडकलेल्या गाड्या काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचाः मडगावात कासा मिनेझिस इमारतीचा काही भाग कोसळला

हिमाचलमध्ये ५०० कोटींचं नुकसान

हिमाचलमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत ५०० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने हिमाचल प्रदेशमध्ये होत्याचं नव्हतं केलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे २००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

हा व्हिडिओ पहाः

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!